27 Mar, 19 11:41 PM
गेल नाही तर रसेल ठरला हिरो
कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामन्यात ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल यांच्यावर साऱ्यांचेच लक्ष होते. पण यावेळी गेल नाही तर रसेल हिरो ठरला. कारण रसेलने 48 धावांची तडफदार खेळी साकारली, त्याचबरोबर गेल आणि सर्फराझ खान यांनाही त्याने बाद केले. त्यामुळे कोलकात्याच्या विजयाचा रसेलच शिल्पकार ठरला.
27 Mar, 19 11:33 PM
डेव्हिड मिलरचे अर्धशतक
मयांक अगरवालनंतर पंजाबच्या डेव्हिड मिलरने अर्धशतक पूर्ण केले.
27 Mar, 19 11:18 PM
मयांक अगरवाल 58 धावांवर आऊट
27 Mar, 19 11:02 PM
मयांक अगरवालचे अर्धशतक
मयांक अगरवालने 28 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.
27 Mar, 19 10:49 PM
सर्फराझ खान आऊट
27 Mar, 19 10:18 PM
पंजाबला मोठा धक्का, गेल आऊट
पहिल्या सामन्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या ख्रिस गेलला दुसऱ्या सामन्यात 20 धावा करता आल्या. वेस्ट इंडिजच्याच आंद्रे रसेलने त्याला बाद केले.
27 Mar, 19 10:08 PM
पंजाबला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद
लोकेश राहुलला यावेळी फक्त एकच धाव करता आली.
27 Mar, 19 09:43 PM
कोलकात्याचा धावांचा पाऊस, पंजाबपुढे 219 धावांचे आव्हान
नितिश राणा आणि रॉबिन उथप्पा यांची अर्धशतके व आंद्रे रसेलच्या तुफानी 48 धावांमुळे कोलकात्याला 218 धावा करता आल्या.
27 Mar, 19 09:39 PM
आंद्रे रसेल आऊट
रसेलने 17 चेंडूंत 48 धावांची वादळी खेळी साकारली.
27 Mar, 19 09:36 PM
कोलकाताच्ये द्विशतक
यंदाचा मोसमात दोनशे धावा पूर्ण करणारा कोलकाता पहिला संघ ठरला.
27 Mar, 19 09:17 PM
रॉबिन उथ्पपाचे अर्धशतक पूर्ण
27 Mar, 19 09:14 PM
धडाकेबाद फलंदाजी करणारा नितिश राणा आऊट
राणाने दमदार फलंदाजी करताना 34 चेंडूंत दोन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 63 धावांची तुफानी खेळी साकारली.
27 Mar, 19 08:56 PM
अश्विनच्या कॅरमबॉलवर कोलकाताच्या शतक पूर्ण
आर. अश्विनच्या 12व्या षटकाचा चौथा चेंडू वाईड ठरला. या वाईट चेंडूसह कोलकात्याच्या फलकावर शंभर धावा पूर्ण झाल्या.
27 Mar, 19 08:49 PM
कार्तिक-राणा जोडी जमली
कोलकात्याची धमाकेदार सुरुवात झाली असली तरी त्यांची 2 बाद 36 अशी स्थिती झाली होती. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि नितिश राणा यांची जोडी जमलेली पाहायला मिळाली.
27 Mar, 19 08:31 PM
उथप्पाच्या षटकारासह कोलकाताचे अर्धशतक पूर्ण
27 Mar, 19 08:21 PM
सुनील नरिन आऊट
सुनिल नरिनच्या रुपात कोलकाताला दुसरा धक्का बसला. नरिनने 9 चेंडूंत 24 धावा केल्या.
27 Mar, 19 08:17 PM
ख्रिस लिन आऊट
ख्रिस लिनच्या रुपात कोलाकाताला पहिला धक्का बसला. लिनला 10 धावांवर समाधान मानावे लागले.
27 Mar, 19 07:46 PM
'हे' आहेत यंदाच्या आयपीएलमधले सिक्सर किंग
http://www.lokmat.com/photos/cricket/these-are-sixer-kings-players-ipl-2019/
27 Mar, 19 07:34 PM
पंजाबने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले
कोलकाताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाबने जिंकला. पंजाबने यावेळी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोलकाताचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.