IPL 2019 : मुंबई-चेन्नई सामना म्हणजे 'एकदम कSSSडक', सांगतोय रोहित शर्मा

IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा पाहुणचार करण्यासाठी सज्ज आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 05:02 PM2019-04-26T17:02:26+5:302019-04-26T17:03:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 : Chennai Super Kings vs Mumbai Indians is a ElClassico of IPL, say Rohit Sharma  | IPL 2019 : मुंबई-चेन्नई सामना म्हणजे 'एकदम कSSSडक', सांगतोय रोहित शर्मा

IPL 2019 : मुंबई-चेन्नई सामना म्हणजे 'एकदम कSSSडक', सांगतोय रोहित शर्मा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वच सामने हे क्रिकेट चाहत्यांसाठी चौकार-षटकारांची आतषबाजी, थरारनाट्य, प्रचंड उत्सुकतेची मेजबानी घेऊन घेणारे असतात. पण, त्यातील दोन अव्वल संघ समोरासमोर आले की चाहत्यांना जागेवरून हलावेसेही वाटत नाही. आज आयपीएलमध्ये अशाच दोन तगड्या संघांमध्ये सामना रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा पाहुणचार करण्यासाठी सज्ज आहेत. पण, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्स संघ चेन्नईतही आपली ताकद दाखवण्यासाठी आतुर आहे. हिटमॅन रोहितने या दोन संघांमधील लढतीला आयपीएलमधील 'ElClassico' असे संबोधले आहे. 





स्पॅनिश फुटबॉल लीगमधील दोन कट्टर प्रतिस्पर्धी रेयाल माद्रिद आणि बार्सिलोना यांच्यातील सामन्याला जगभरात ElClassico असे संबोधले जाते. आज जसे भारतातील क्रिकेट चाहते चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यासाठी आतुरले आहेत. तशीच आतुरता जगभरातील फुटबॉल चाहत्यांना बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद यांच्यातील सामन्यासाठी असते. या दोन क्लबचा सामना पाहण्यासाठी लाखाहून अधिक प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडियमही खच्चून भरलेले असते. एवढेच काय तर स्टेडियमबाहेर लावलेल्या जायंट स्क्रीनवर हा सामना पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने फुटबॉल चाहते उपस्थित असतात.असेच वातावरण आजच्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्याली सामन्यादरम्यान पाहायला मिळणार आहे. 


‘प्ले ऑफ’साठी आवश्यक 16 गुणांची कमाई केल्यानंतरही चेन्नई शुक्रवारी कट्टर प्रतिस्पर्धी मुंबईविरुद्ध होणाऱ्या लढतीत वर्चस्वपूर्ण विजय मिळवून स्वत:चे अव्वल स्थान अबाधित राखण्याच्या निर्धारासह उतरणार आहे. तीन वेळा जेतेपद पटकावलेल्या या दोन चॅम्पियन संघातील हा सामना चुरशीचा होईल, यात शंका नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने दोन पराभवानंतर पुन्हा विजयपथावर वाटचाल केली. शेन वॉटसनच्या आक्रमक खेळीच्या बळावर त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा सहा गड्यांनी पराभव केला.

मुंबई 10 सामन्यात 12 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करल्यानंतर येथे दाखल झालेल्या मुंबईकर विजयाच्या प्रयत्नात असतील. चेन्नईने वॉटसनच्या खेळीचे स्वागत केले. पण सुरेश रैना, अंबाती रायुडू आणि केदार जाधव यांच्याकडून अधिक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. 

 

Web Title: IPL 2019 : Chennai Super Kings vs Mumbai Indians is a ElClassico of IPL, say Rohit Sharma 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.