मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सच्या विजयी मिरवणूकीला सुरुवात झाली असून चाहत्यांचा त्यांना भरघोस पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळाले. मिरवणूसाठी खास बस बनवण्यात आली असून या बसमध्ये खेळाडूंसह संघाच्या मालकिण नीता अंबानीही होत्या.
हा पाहा खास व्हिडीओ
मुंबई इंडियन्सच्या मिरवणूकीला पुणेरी साज, ढोल-ताश्यांच्या गजरात झाली सुरुवात
मुंबई इंडियन्सने आयपीएलचे जेतेपद जिंकले आणि त्यानंतर त्यांची विजयी मिरवणूक नुकतीच सुरु झाली आहे. या मुंबईच्या विजयी मिरवणूकीला पुणेरी साज चढल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण या मिरवणूकीची सुरुवात झाली आहे ते पुणेरी ढोल-ताश्यांच्या गजरात.
पाहा हा खास व्हिडीओ
ऑरेंज, पर्पल कॅपचे आम्हाला घेणेदेणे नाही, सांगतायत मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक, व्हिडीओ वायरल
मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावले खरे, पण मुंबईच्या एकाही खेळाडूला ऑरेंज किंवा पर्पल कॅप पटकावता आली नाही. पण मुंबई इंडियन्सला या गोष्टीचे काहीच देणेघेणे नसल्याचे त्यांचे प्रशिक्षक सांगत आहेत. सामना संपल्यावर मुंबई इंडियन्सची एक मिटींग झाली. या खास मिटींगचा व्हिडीओ आता चांगलाच वायरल झाला आहे.
पाहा हा खास व्हिडीओ
विजयाचे सेलिब्रेशन झाल्यावर मुंबईच्या संघाची एक खास मिटींग झाली. या मिटींमध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी एक भाषण केले. या भाषणामध्ये ते म्हणाले की, " आपल्याला ऑरेंज कॅप मिळवता आली नाही. पर्पल कॅपही आपल्याकडे नाही. पण या गोष्टीची पर्वा आपल्याला नाही. कारण आयपीएलचा चषक आपल्याकडे आहे."
... जेव्हा पत्नी रितिका घेते रोहित शर्माची खास मुलाखत, पाहा व्हिडीओ
मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या काही मुलाखती झाल्या. पण रोहितची खास मुलाखत घेतली ती त्याची पत्नी रितिकाने. यावेळी रितिकाने रोहितला काही भावुक प्रश्नही विचारले.
रितिकाने विचारले की, " समायराच्या समोर मुंबईने चौथ्यांदा आयपीएलचे जेतपद पटकावले आहे, याबद्दल तुला काय वाटते?" या प्रश्नावर रोहित म्हणाला की, " फक्त समायराच नाही तर तुझ्या उपस्थितीतही आम्ही जेतेपद पटकावले या गोष्टीचा आनंद आहे."
हा पाहा खास व्हिडीओ
रोहित आणि युवराजने केला 'गली बॉय'च्या गाण्यावर रॅप, व्हिडीओ वायरल
आयपीएलचे जेतेपद पटकावल्यावर मुंबई इंडियन्सने एका पबमध्ये आपला आनंद साजरा केल्याचे वृत्त आहे. या पबमधील मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांच्या रॅप डान्सचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या दोघांनी 'गली बॉय'च्या गाण्यावर डान्स केल्याचे या व्हीडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
हा पाहा खास व्हिडीओ
नीता अंबानींना चाहते म्हणतायत, आम्हालाही सांगा विजयाचा मंत्र
मुंबईने आयपीएलचे चौथे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीचा सामना रोमहर्षक झाला. अखेरचा चेंडू पडेपर्यंत नेमका कोणता संघ हा सामना जिंकेल, हे कोणाच्याही गावी नव्हते. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या मालकिण नीता अंबानी चांगल्याच टेन्शनमध्ये आल्या होत्या. त्यावेळी अंबानी कुठलाही तरी मंत्र म्हणत असल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा मुंबईने सामना जिंकला तेव्हा अंबानी डोळे बंद करून मंत्र म्हणत होत्या, त्यामुळे त्यांना मुंबईचा विजय पाहता आला नाही. आता सर्वांना प्रश्न पडला आहे की, हा विजयाचा मंत्र नेमका आहे तरी काय. त्यामुळे आता चाहत्यांनी अंबानी यांना हा मंत्र शेअर करायची विनवणी केली आहे.
मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्डच्या ( 25 चेंडूंत नाबाद 41 धावा ) धडाकेबाज खेळीच्या जोरावर 8 बाद 149 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 7 बाद 148 धावांपर्यंतच मजल मारता आली. शेन वॉटसनने ( 80 धावा) एकाकी झुंज दिली. पण, अखेरच्या षटकात लसिथ मलिंगाने चेन्नईच्या तोंडचा घास पळवला आणि मुंबईचे चौथ्यांदा आयपीएलचा चषक उंचावला.