Join us

IPL 2019 : ... आणि चेन्नई-हैदराबाद सामन्यात रंगला नो-बॉलचा वाद

यावेळी रवींद्र जडेजा आणि अंबाती रायुडू यांनी मैदानातील पंचांची वाद घातल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 22:25 IST

Open in App

हैदराबाद, आयपीएल २०१९ : चेन्नई सुपर किंग्स आणइ सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात एक वाद रंगला होता. हा वाद झाला तो एका नो-बॉलवरून. यावेळी रवींद्र जडेजा आणि अंबाती रायुडू यांनी मैदानातील पंचांची वाद घातल्याचे पाहायला मिळाले.

चेन्नईच्या मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे जडेजा आणि रायुडू हे जलदगतीने धावा जमवण्याचा प्रयत्न करत होते. या सामन्यातील अखेरचे षटक टाकत होता तो भुवनेश्वर कुमार. या अखेरच्या षटकातील तिसरा चेंडू भुवनेश्वरने बाऊन्सर टाकला. त्यानंतर चौथा चेंडूही भुवनेश्वरने बाऊन्सर टाकला. हा भुवनेश्वरच्या षटकातील दुसरा बाऊन्सर होता. नियमानुसार हा नो-बॉल होता. पण पंचांनी दुसरा बाऊन्सर नो-बॉल दिला नाही. 

मैदानावरील पंचांनी हा नो-बॉल का दिला नाही, याची विचारण जडेजाने मैदानावरील पंचांकडे केली. रायुडूनेही यावेळी पंचांना याबाबत विचारणा केली. पण पंचांनी यावेळी जडेजाची नो-बॉलची मागणी फेटाळली. यावेळी तिसरा चेंडू हा नो-बॉल नव्हता, असे पंचांनी सांगितले आणि जडेजा निराश झाला.

चेन्नईच्या १३२ धावा

दमदार सलामी मिळाल्यानंतरही चेन्नई सुपर किंग्सला फक्त 132 धावांवरच समाधान मानावे लागले. 

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी चेन्नईच्या शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ७९ धावांची सलामी दिली. वॉटसनने यावेळी २९ चेंडूंत ३१ धावा केल्या. शेनपेक्षा फॅफ चांगल्या फॉर्मात होता. फॅफने ३१ चेंडूंत ४५ धावांची खेळी साकारली. या ४५ धावांच्या खेळीत फॅफने तीन चौकार आणि तीन षटकार लगावले.

शेन आणि फॅफ जेव्हा बाद झाले तेव्हा अकराव्या षटकात चेन्नईची २ बाद ८१ अशी स्थिती होती. पण त्यानंतर कर्णधार सुरेश रैना, केदार जाधव, सॅम बिलिंग्स हे झटपट बाद झाले आणि चेन्नईचा डाव अडचणीत आला. त्यानंतर अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा यांनी संघाला सावरले.

टॅग्स :रवींद्र जडेजाअंबाती रायुडूचेन्नई सुपर किंग्सभुवनेश्वर कुमार