Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2019 : ... अन् त्या आज्जीबाईंसोबत धोनीने काढला सेल्फी, पाहा खास व्हिडीओ

मुंबई इंडियन्यविरुद्धच्या सामन्यानंतर मात्र धोनीला दोन चाहते भेटायला आले आणि साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 17:55 IST

Open in App

मुंबई, आयपीएल २०१९ : महेंद्रसिंग धोनी हा एक महान क्रिकेटपटू आहे, हे साऱ्यांनाच परिचीत आहेच. पण हे त्याच्या चाहत्यांमधनूही पाहायला मिळू शकतं. मैदानात एक व्यक्ती अंगावर तिरंग्याचे रंग लावून त्यावर धोनीचे नाव कोरलेला पाहायला मिळतो. काही ठिकाणी मैदानात चाहते घुसून थेट धोनीच्या पायाही पडतात. पण मुंबई इंडियन्यविरुद्धच्या सामन्यानंतर मात्र धोनीला दोन चाहते भेटायला आले आणि साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.

 

वानखेडेवर बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नईला मुंबईकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर धोनीच्या दोन चाहत्या बऱ्याच काळ स्टेडियममध्ये थांबल्या होत्या. त्यांना धोनीला भेटायचे होते. हा संदेश धोनीकडे पोहोचला आणि त्यानंतर धोनी त्यांच्यासाठी थेट पेव्हेलियनमधून खाली उतरला. मैदानात आल्यावर धोनीने या चाहत्यांची भेट घेतली. या चाहत्या होत्या एक आज्जीबाई आणि त्यांच्या नातीच्या वयाची एक मुलगी. या दोघीही धोनीच्या चाहत्या होत्या. या आज्जीबाईंनी धोनीसाठी खास एक फलक बनवला होता. तो फलक त्यांनी धोनीना दाखवला. धोनीला तो फलक आवडला आणि त्याने तो स्वत: जवळ ठेवूनही घेतला. त्यानंतर बराच वेळ धोनी या आज्जीबाईंशी गप्पा मारत होत्या. धोनीही त्यांच्या गोष्टी आपलेपणाने ऐकत होता. संवाद संपल्यावर या दोघींना धोनीबरोबर फोटो काढायचा मोह आवरता आला नाही. धोनीही फोटोसाठी उभा राहिला. आज्जीबाई धोनीच्या या भेटीने तृप्त झाल्या. पण धोनी जसे धक्के देत असतो, तसा सुखद धक्का त्याने यावेळीही दिला. धोनीने त्या आज्जीबाईंचा मोबाईल आपल्या हातामध्ये घेतला आणि आज्जीबाईंसोबत खास सेल्फी काढला.

हा पाहा खास व्हिडीओ

बुधवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंब इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. हेलिकॉप्टर हा शॉट महेंद्रसिंग धोनीचा खास असल्याचे म्हटले जाते. पण या सामन्यात हार्दिकने हेलिकॉप्टर शॉट मारला आणि धोनी फक्त हा फटका पाहतच बसल्याच पाहायला मिळाले. 

चेन्नईविरुद्धच्या खेळीत हार्दिकने तिसऱ्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरला षटकार खेचत आपले इरादे स्पष्ट केले. हार्दिकने हेलिकॉप्टर शॉट हा अखेरच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. अखेरचे षटक चेन्नईचा ड्वेन ब्राव्हो टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ब्राव्होने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हार्दिकने हेलिकॉप्टर शॉट मारल्याचे पाहायला मिळाले. यावेळी धोनीही हा फटका फक्त बघत बसल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सआयपीएल 2019