Join us  

IPL 2019 : अंबाती रायुडू 4D इफेक्ट देणारा खेळाडू, सोशल मीडियावर होतोय ट्रोल

सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी रायुडूला ट्रोल केल्याचेही पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 4:35 PM

Open in App

चेन्नई, आयपीएल 2019 : भारताच्या विश्वचषकाच्या संघात अंबाती रायुडूची निवड करण्यात आली नाही. त्यानंतर रायुडूने, मी 3D गॉगल परीधान करून भारताचे सामने पाहणार आहे, अशी टीका निवड समितीनं केली होती. पण आता मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर तर अंबाती रायुडू 4D इफेक्ट देणारा खेळाडू आहे, अशी चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी रायुडूला ट्रोल केल्याचेही पाहायला मिळाले आहे.

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप २०१९ स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. पण या संघातअंबाती रायुडू नसल्याने बऱ्याच जणांनी निवड समितीवर टीका केली. त्यानंतर रायुडूनेही निवड समितीवर तोफ डागली होती. पण चाहत्यांनी त्याची टीका लक्षात ठेवली आणि आता त्यांनी रायुडूलाच ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

शुक्रवारी मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी खेळत नव्हता. त्यामुळे रायुडूवर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या सांमन्यानंतर चाहत्यांनी रायुडूची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले.

रायुडू फलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण करू शकतो. त्याचबरोबर आयसीसीने परवानगी दिली तर तो गोलंदाजीही करू शकतो. त्यामुळे रायुडू 4D इफेक्ट देणारा खेळाडू आहे. त्यामुळे बीसीसीआयने विश्वचषकासाठी त्याची निवड करायला हवी होती, असे चाहत्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

पंधरा सदस्यीय भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

भारताचे सामने ( वेळ दुपारी 3 वाजता) बुधवार 5 जून 2019 : द. आफ्रिकारविवार 9 जून 2019 : ऑस्ट्रेलियागुरुवार 13 जून 2019 : न्यूझीलंडरविवार 16 जून 2019 : पाकिस्तानशनिवार 22 जून 2019 : अफगाणिस्तानगुरुवार 27 जून 2019 : वेस्ट इंडिजरविवार 30 जून 2019: इंग्लंड मंगळवार 2 जुलै 2019 : बांगलादेश शनिवार 6 जुलै 2019: श्रीलंका

टॅग्स :अंबाती रायुडूचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सआयपीएल 2019