Join us

IPL 2019 : कृणाल पांड्याला बॉलिवूडमधून ऑफर, या अभिनेत्याची सोबत काम करण्याची इच्छा  

मुंबई, आयपीएल 2019 : भारतीय ट्वेंटी-20 संघाचा सदस्य आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज कृणाल पांड्याला बॉलिवूडमधून ऑफर मिळाली आहे. ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 15:53 IST

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : भारतीय ट्वेंटी-20 संघाचा सदस्य आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज कृणाल पांड्याला बॉलिवूडमधून ऑफर मिळाली आहे. हार्दिकसारखे ग्लॅमर कृणालच्या पायाशी घुटमळत नसले तरी बॉलिवूडमधील एका मोठ्या नायकाने त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या अभिनेत्याने सोशल मीडियावरून ही ऑफर दिली असून त्यावर कृणालनेही गमतीदार उत्तर दिले. 

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल 2019 ) मुंबई इंडियन्स सहाव्या स्थानावर आहे. चार सामन्यांत दोन विजयासह त्यांच्या खात्यात 4 गुण आहेत. कृणालने या चार सामन्यांत फलंदाज म्हणून आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे, गोलंदाजीत त्याला फार प्रभाव पाडता आलेला नाही. त्याला तीनच विकेट घेता आल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांविरुद्ध त्याची बॅट चांगलीच तळपली आणि त्याने अनुक्रमे 32 व 42 धावांची खेळी केली. 

बॉलिवूडमधील आघाडीचा नायक अजय देवगणला कृणालने 2 एप्रिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कृणालने यावेळी अजय देवगणसह असलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. देवगणने 3 एप्रिलला त्यावर उत्तर देताना कृणालला एका डबल रोलची भूमिका असलेल्या चित्रपटात एकत्र काम करूया, अशी ऑफर दिली. अर्थात देवगणने ही ऑफर गंमत म्हणून दिली आहे.

 मुंबई इंडियन्सने साकारली विजयाची सेंच्युरीवानखेडेवर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला ३७ धावांनी पराभूत केले. मुंबईचा हा आतापर्यंतच्या आयपीएलमधील शंभरावा विजय ठरला. यापूर्वी मुंबईने १७४ सामन्यांमध्ये ९९ विजय मिळवले होते. या सामन्यात मुंबईने विजयाचे शतक पूर्ण केले. दुसरीकडे या पराभवामुळे चेन्नईला गुणतालिकेतील अव्वल स्थान गमवावे लागले. या सामन्यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबईने १७४ सामने खेळले होते. या १७४ सामन्यांमध्ये मुंबईला ७५ सामने गमवावले लागले होते, तर ९९ लढतींमध्ये त्यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे चेन्नईवर त्यांनी या लढतीत मात करत मुंबईने शंभरावा विजय साजरा केला.

टॅग्स :आयपीएल 2019अजय देवगणमुंबई इंडियन्सक्रुणाल पांड्या