IPL 2018 : जेव्हा झिवाला, बाबा धोनीला मिठी मारण्याचा मोह झाला...

रविवारी धोनी आयपीएलचा सामना खेळत होता. त्यावेळी त्याची लहानगी झिवा असाच एक बालहट्ट करत होती. झिवा या सामन्यादरम्यान आपल्या बाबांना म्हणजे धोनीला मिठी मारण्याचा मोह झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 18:43 IST2018-04-16T18:43:18+5:302018-04-16T18:43:18+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2018: When Ziva want to hug Dhoni ... | IPL 2018 : जेव्हा झिवाला, बाबा धोनीला मिठी मारण्याचा मोह झाला...

IPL 2018 : जेव्हा झिवाला, बाबा धोनीला मिठी मारण्याचा मोह झाला...

ठळक मुद्देधोनी जेव्हा फटकेबाजी करत होता, तेव्हा झिवा आपल्या बाबांना पाठिंबा देत होती.

मोहाली : लहानपण देगा देवा... ही ओळ साऱ्यांनाच परवलीची. लहानपण हे निरागस असतं. परिस्थिती काहीही असो, आपल्याला जे हवंय त्यासाठी बालहट्ट होतोच. अशीच काहीशी गोष्ट चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीतही घडली. रविवारी धोनी आयपीएलचा सामना खेळत होता. त्यावेळी त्याची लहानगी झिवा असाच एक बालहट्ट करत होती. झिवा या सामन्यादरम्यान आपल्या बाबांना म्हणजे धोनीला मिठी मारण्याचा मोह झाला होता.

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई यांच्यामध्ये रविवारी रंगतदार सामना झाला. चेन्नईला विजयासाठी 198 धावांची गरज होती. धोनीने यावेळी अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिली, पण त्याला चेन्नईला सामना जिंकवून देता आला नाही. पण धोनीने या सामन्यात आयपीएलमधील सर्वाधिक 79 धावांची खेळी साकारली. हा सामना पाहण्यासाठी धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा या दोघीही स्टेडियममध्ये होत्या.

धोनी जेव्हा फटकेबाजी करत होता, तेव्हा झिवा आपल्या बाबांना पाठिंबा देत होती. या सामन्यानंतर धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हीडीओ पोस्ट केला होता. या व्हीडीओमध्ये झिवा धोनीला मैदानात भेटण्यासाठी आतूर होती. त्याचबरोबर मला बाबांना मिठी मारायची आहे, असं आर्जवही ती करत  होती.

Web Title: IPL 2018: When Ziva want to hug Dhoni ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.