Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2018 : पराभवानंतर प्रीती झिंटा सेहवागवर भडकते तेव्हा...

लोकेश  राहुलच्या खेळीनंतरही जेव्हा पंजाबचा पराभव झाला तेव्हा मात्र प्रीती चांगलीच खवळली. सामन्यानंतर ती सेहवागकडे आली आणि आपला राग त्याच्यावर काढला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 18:32 IST

Open in App
ठळक मुद्देराजस्थान रॉयल्सविरुद्धचा पराभव किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकिण प्रीती झिंटाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसत आहे.

जयपूर : राजस्थान रॉयल्सविरुद्धचा पराभव किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकिण प्रीती झिंटाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसत आहे. कारण या पराभवानंतर प्रीती फारच निराश झाली होती. या निराशेमध्ये तिने संघाचे मुख्य मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागवर चांगलीच भडकली, असे सूत्रांनी सांगितले आहे.

मंगळवारी राजस्थानने पंजाबपुढे 159 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाला 143 धावा करता आल्या आणि त्यांना पंधरा धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सलामीवीर लोकेश राहुलने यावेळी नाबाद 95 धावांची खेळी साकारली, पण त्याला पंजाबला जिंकवून देण्यात अपयश आले. 

पंजाबला आतापर्यंत जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर एकही सामना जिंकता आलेला नाही. राजस्थानने पाचव्यांदा आपल्या मैदानात पंजाबला पराभूत करण्याची किमया साधली. त्यामुळे पंजाबला विजयासाठी जेव्हा 159 धावांची गरज होती, तेव्हा आपल्या संघाला या स्टेडियममध्ये पहिला विजय मिळेल, असे प्रीतीला वाटत होते. पण लोकेश  राहुलच्या खेळीनंतरही जेव्हा पंजाबचा पराभव झाला तेव्हा मात्र प्रीती चांगलीच खवळली. सामन्यानंतर ती सेहवागकडे आली आणि आपला राग त्याच्यावर काढला. 

टॅग्स :विरेंद्र सेहवागकिंग्ज इलेव्हन पंजाबसनरायझर्स हैदराबाद