Join us  

IPL 2018 : न खेळताच सुरेश रैनानं केला आगळावेगळा विक्रम

198 धावांचा पाठलाग करताना धोनीनं दमदार अर्धशतक केलं, पण पराभव टाळू शकला नाही, काल चेन्नईच्या संघाला सुरेश रैनाची कमी नक्कीच जाणवली असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 3:15 PM

Open in App

नवी दिल्ली - दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या पहिल्या दोन्ही लढतीत थरारक विजयांची नोंद केली होती. काल मोहाली येथे झालेल्या सामन्यात पंजाबने चेन्नईचा चार धावांनी पराभव केला. 198 धावांचा पाठलाग करताना धोनीनं दमदार अर्धशतक केलं, पण पराभव टाळू शकला नाही, काल चेन्नईच्या संघाला सुरेश रैनाची कमी नक्कीच जाणवली असेल.

चेन्नईकडून खेळताना रैनाने मोठ्या धावसंखेच्या सामन्यामध्ये फलंदाजी करताना मोठ्या खेळी केल्या आहेत. दुखापतीमुळं सुरेश रैनाला आराम देण्यात आला आहे. या सामन्यात न खेळताही रैनाच्या नावावर आगळावेगळा विक्रम केला आहे. सुरेश रैना आयपीएलच्या सामन्यात खेळला नाही असे 2008 नंतर पहिल्यांदाच झालं आहे. दोन वर्षाची चेन्नई संघावर लागलेल्या बंदीचा कालावधी सोडता आयपीएलला सुरुवात झाल्यापासून रैना चेन्नईकडून प्रत्येक सामन्यात खेळला आहे.  

सुरेश रैनाने चेन्नईकडून सलग 158 सामने (आयपीएल आणि चॅम्पियन लीग) खेळला आहे. कोणत्याही संघाकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. त्यानंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो. विराटने बंगळुरु संघाकडून 144 सामने खेळले आहेत. रैना आणि विराटनंतर धोनीचा क्रमांक लागतो. धोनीनं चेन्नई संघाकडून 124 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सुरेश रैनाच्या नावार आहे. रैनाने 33.76 च्या सरासरीने 4558 धावा केल्या आहेत. 

पंजाबचा विजय - 

शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात चार धावांनी विजय मिळवत मोहालीत पंजाबच किंग असल्याचे अश्विन सेनेने दाखवून दिले.  79 धावांची खेळी करत धोनीने अखेरपर्यंत किल्ला लढवला. परंतू तो संघाला  विजय मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईचा संघ 20 षटकात  193 धावापर्यंतच मजल मारू शकला. त्याआधी मोहालीत घरच्या मैदानावर खेळताना पंजाबने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईसमोर धावांचे 198 आव्हान ठेवले होते.  गेलने 33 चेंडूत 63 धावा ठोकल्या. 

टॅग्स :आयपीएल 2018सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्सकिंग्ज इलेव्हन पंजाब