CSK vs KXIP, IPL 2018 LIVE: Chennai won the toss and elected to bowl first | CSK vs KXIP, IPL 2018 : रोमहर्षक लढतीत पंजाबचा चेन्नईवर चार धावांनी विजय
CSK vs KXIP, IPL 2018 : रोमहर्षक लढतीत पंजाबचा चेन्नईवर चार धावांनी विजय

ठळक मुद्देअखेरच्या षटकापर्यंत धोनीने पंजाबला कडवी झुंज दिली, पण त्याला चेन्नईला विजय मिळवून देता आला नाही. धोनीने 44 चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटाकारांच्या जोरावर नाबाद 79 धावांची खेळी साकारली.

मोहाली : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबना अखेर चेन्नई सुपर किंग्जवर चार धावांनी विजय मिळवला. ख्रिस गेलच्या स्फोटक खेळीच्या जोरावर पंजाबला चेन्नईपुढे 198 धावांचे आव्हान ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अखेरपर्यंत किल्ला लढवला, पण धोनीला हा सामना चेन्नईला जिंकवून देता आला नाही. या विजयाच्या जोरावर पंजाबने गुणतालिकेत चेन्नईला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे, तर चेन्नईची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

 

पंजाबच्या 198 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची चांगली सुरुवात झाली नाही. त्यांनी दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पण त्यानंतर अंबाती रायुडूने चेन्नईचा किल्ला लढवला. पण दुर्देवीरीत्या तो 49 धावांवर धावचीत झाला. रायुडू बाद झाल्यावर धोनीने सामन्याची सारी सूत्रे हातात घेतली. या सामन्यात पुन्हा एकदा जुना धोनी पाहायला मिळाला. त्याची फटकेबाजी पाहून चेन्नईच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अखेरच्या षटकापर्यंत धोनीने पंजाबला कडवी झुंज दिली, पण त्याला चेन्नईला विजय मिळवून देता आला नाही. धोनीने 44 चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटाकारांच्या जोरावर नाबाद 79 धावांची खेळी साकारली.

 

चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दीपक चहारच्या पहिल्या षटकात लोकेश राहुलने दोन चौकार लगावत संघाला चांगली सुरुवात करून दिली. गेल पहिल्यांदा मैदानात उतरल्यावर कशी फलंदाजी करेल, याची उत्सुकता साऱ्यांना होती. गेलनेही आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. गेलने आपल्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत दणक्यात सुरुवात केली. या दोघांनी आठ षटकांमध्ये 96 धावांची सलामी देताना चेन्नईच्या गोलंदाजीची हवा काढून टाकली. पण त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात राहुल बाद झाला, त्याने 22 चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर 37 धावा केल्या. दुसरीकडे गेलने चेन्नईच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले. आपल्या पहिल्याच सामन्यात गेलने 22 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यानंतर संघाला 10 षटकांमध्ये 115 धावांची मजल मारून दिली. पण शेन वॉटसनने यावेळी गेलला बाद करत चेन्नईला मोठे यश मिळवून दिले. गेलने 33 चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 63 धावांची झंझावाती खेळी साकारली. गेल बाद झाल्यावर पंजाबच्या धावगतीला थोडा ब्रेक लागला आणि त्यांना 20 षटकांत 197 धावा करता आल्या. 

 

11.44 PM : चेन्नईचा पहिला पराभव, पंजाबचा चार धावांनी विजय

11.43 PM : चेन्नईला विजयासाठी एका चेंडूत 11 धावांची गरज

11.42 PM : चेन्नईला विजयासाठी 2 चेंडूंत 11 धावांची गरज

11.41 PM : चेन्नईला विजयासाठी 3 चेंडूंत 11 धावांची गरज

11.40 PM : चेन्नईला विजयासाठी 4 चेंडूंत 15 धावांची गरज, मोहित शर्माचा वाईड चेंडू

11.40 PM : चेन्नईला विजयासाठी 4 चेंडूंत 16 धावांची गरज

11. 39 PM : चेन्नईला विजयासाठी 5 चेंडूंत 16 धावांची गरज

11.38 PM : चेन्नईला विजयासाठी 6 चेंडूंत 17 धावांची गरज

11.37 PM : चेन्नईला विजयासाठी 7  चेंडूंत 23 धावांची गरज

11.36 PM : चेन्नईला विजयासाठी 8 चेंडूंत 25 धावांची गरज

11.33 PM : चेन्नईला पाचवा धक्का; रवींद्र जडेजा OUT

11.31 PM : चेन्नईला विजयासाठी 12 चेंडूंत 36 धावांची गरज

11.30 PM : धोनीचे 34 चेंडूत अर्धशतक

11.29 PM : धोनीचा उत्तुंग षटकार; चेन्नईला विजयासाठी 14 चेंडूंत 43 धावांची गरज

11.24 PM : चेन्नईला विजयासाठी 18 चेंडूंत 55 धावांची गरज

11.10 PM : चेन्नई 15 षटकांत 4 बाद 122

11.00 PM : अंबाती रायुडू 49 धावांवर बाद; चेन्नईला चौथा धक्का

- आर. अश्विनच्या अप्रतिम थेट फेकीमुळे चेन्नईचा रायुडू बाद झाला, त्याचे अर्धशतक फक्त एका धावेने हुकले.

10.52 PM : चेन्नईचे 12 षटकांत शतक पूर्ण

- रायुडू आणि धोनी यांनी दमदार फलंदाजी करत बाराव्या षटकात संघाचे शतक पूर्ण केले.

10.45 PM : चेन्नई दहा षटकांत 3 बाद 85

- सातव्या षटकात तीन धक्के बसल्यावर महेंद्रसिंग धोनी आणि अंबाती रायुडू यांनी चेन्नईचा डाव सावरला. दहा षटकांमध्ये चेन्नईने 85 धावा फटकावल्या होत्या.

10.30 PM : चेन्नईला तिसरा धक्का; सॅम बिलिंग्स OUT

- पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने लेग स्पिन टाकत सॅम बिलिंग्सला तंबूत धाडले. 

10.21 PM : चेन्नई 5 षटकांत 2 बाद 46

- पहिल्या पाच षटकांमध्ये चेन्नईने आपले दोन्ही सलामीवीर गमावले. पण तरीही त्यांनी जवळपास 9 च्या सरासरीने 46 धावा फटकावल्या.

10.18 PM : सलामीवीर मुरली विजय OUT; चेन्नईला दुसरा धक्का

- पाचव्या षटकात अँण्ड्र्यू टायने मुरली विजयला बाद केले. मुरली विजयने 12 धावा केल्या.

10.06 PM : चेन्नईला धक्का; शेन वॉटसन OUT

- दुसऱ्या षटकात दोन चौकार लगावल्यावर याच षटकातील अखेरच्या चेंडूवर वॉटसन बाद झाला आणि चेन्नईला पहिला धक्का बसला.

10.01 PM : शेन वॉटसनचा चेन्नईसाठी पहिला चौकार

- शेन वॉटसनने मोहित शर्माच्या दुसऱ्या षटकार सलग दोन चौकार लगावत चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली.

मोहाली : ख्रिस गेल पहिल्याच सामन्यात आपल्या नावाला जागला. पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या गेलने झंझावाती फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवले. गेलच्या स्फोटक खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबला चेन्नईपुढे 198 धावांचे आव्हान ठेवता आले.

चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दीपक चहारच्या पहिल्या षटकात लोकेश राहुलने दोन चौकार लगावत संघाला चांगली सुरुवात करून दिली. गेल पहिल्यांदा मैदानात उतरल्यावर कशी फलंदाजी करेल, याची उत्सुकता साऱ्यांना होती. गेलनेही आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. गेलने आपल्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत दणक्यात सुरुवात केली. या दोघांनी आठ षटकांमध्ये 96 धावांची सलामी देताना चेन्नईच्या गोलंदाजीची हवा काढून टाकली. पण त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात राहुल बाद झाला, त्याने 22 चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर 37 धावा केल्या. दुसरीकडे गेलने चेन्नईच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले. आपल्या पहिल्याच सामन्यात गेलने 22 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यानंतर संघाला 10 षटकांमध्ये 115 धावांची मजल मारून दिली. पण शेन वॉटसनने यावेळी गेलला बाद करत चेन्नईला मोठे यश मिळवून दिले. गेलने 33 चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 63 धावांची झंझावाती खेळी साकारली. गेल बाद झाल्यावर पंजाबच्या धावगतीला थोडा ब्रेक लागला आणि त्यांना 20 षटकांत 197 धावा करता आल्या. 

21.38 PM : पंजाबचे चेन्नईपुढे 198 धावांचे आव्हान

9.31 PM : धोनीने घेतला अश्विनचा झेल

- धोनी आणि अश्विन हे आयपीएलमध्ये पहिल्यांदा आमने-सामने आले होते. हे दोघे कसे खेळतात, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पण यावेळी अश्विनच्या नशिबी धोनीच्या हाती बाद होणे लिहीले होते. अश्विनने 11 चेंडूंत 14 धावा केल्या

9.17 PM : युवराज OUT, पंजाबला पाचवा धक्का

- मुंबईच्या शार्दुल ठाकूरने युवराज सिंगला बाद करत चेन्नईला मोठे यश मिळवून दिले. युवराजने 13 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 20 धावा केल्या.

9.12 PM : पंजाब 15 षटकांत 4 बाद 154

8.57 PM : OUT.. पंजाबला मोठा धक्का; गेलला वॉटसनने केले बाद

- शेन वॉटसनने गेलला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. गेलने 33 चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 63 धावांची झंझावाती खेळी साकारली.

8.50 PM : बंगळुरु 10 षटकांत 1 बाद 115

- राहुल बाद झाला असला तरी गेलने मात्र आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. गेलच्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने 10 षटकांत 115 धावा केल्या.

8.35 PM : गेलचे 22 चेंडूंत अर्धशतक

- गेलने चेन्नईच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले. आपल्या पहिल्याच सामन्यात गेलने 22 चेंडूंत अर्धशतक झळकावले.

8.30 PM : सहाव्या षटकात 22 धावांची वसूली; गेलचे प्रत्येकी दोन षटकार आणि चौकार

- गेलने दीपक चहारच्या सहाव्या षटकात तब्बल 22 धावांची लूट केली. गेलने यावेळी दोन चौकार आणि दोन षटकारांची अातषबाजी केली.

8.26 PM : पंजाब 5 षटकांत बिनबाद 53; गेल आणि राहुलची चौफेर फटकेबाजी

- गेल आणि राहुल यांनी पंजाबच्या गोलंदाजांची पिसे काढली. पहिल्या पाच षटकांमध्ये या दोघांनी कुठलीही जोखीम न उठवता संघाचे अर्धशतक फलकावर लावले.

8.08 PM : ख्रिस गेलची धडाकेबाज सुरुवात, पहिल्याच चेंडूवर चौकार

- गेलने आपल्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत दणक्यात सुरुवात केली.

8.06 PM : ख्रिस गेल पहिल्यांदाच उतरला मैदानात, झंझावाती खेळीची अपेक्षा

- गेल पहिल्यांदा मैदानात उतरल्यावर कशी फलंदाजी करेल, याची उत्सुकता साऱ्यांना होती. गेलनेही आपल्या चाहत्यांना निराश केले नाही.

8.03 PM : लोकेश राहुलची फटकेबाजी सुरु; चौकाराने उघडले खाते

- दीपक चहारच्या पहिल्या षटकात राहुलने दोन चौकार लगावत चांगली सुरुवात केली.

7.50 PM : चेन्नईचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय

चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यात साऱ्यांच्या नजरा असतील त्या महेंद्रसिंग धोनी आणि आर. अश्विन या दोन्ही कर्णधारांवर. कारण हे दोघे बरीच वर्षे एकाच संघात होते. अश्विन हा धोनीचा लाडका गोलंदाज होता. आता हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे या सामन्यात कोणाची रणनिती यशस्वी ठरणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

दोन्ही संघ

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फॅफ ड्यू प्लेसिस, हरभजन सिंग, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, केदार जाधव, अंबाती रायुडू, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, जगदीशन नारायण, मिचेल सँटनर, दीपक चहार, के.एम. आसिफ, लुंगी एनगिडी, कनिष्क सेठ, ध्रुव शौरी, मुरली विजय, सॅम बिलिंग्स, मार्क वूड, क्षितीज शर्मा, मोनू सिंग, चैतन्य बिश्नोई.

किंग्ज इलेव्हन पंजाब :आर. अश्विन (कर्णधार), आरोन फिंच, डेव्हिड मिलर, करुण नायर, मनोज तिवारी, मयांक अगरवाल, अक्षर पटेल, ख्रिस गेल, मंझूर दार, मार्कस स्टॉइनिस, प्रदीप साहू, युवराज सिंग, अक्षदीप नाथ, लोकेश राहुल, अॅड्रू टाय, अंकित राजपूत, बरिंदर सरन, बेन ड्वारशस, मयांक डागर, मोहित शर्मा, मजीब उर रेहमान.
 


Web Title: CSK vs KXIP, IPL 2018 LIVE: Chennai won the toss and elected to bowl first
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.