IPL 2021 Schedule: दे घुमाके! 'आयपीएल'च्या नव्या तारखा ठरल्या, दसऱ्याला रंगणार अंतिम सामना

क्रिकेट जगतात सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून ओळख असलेली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) यावेळी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आळी होती. २९ सामने झाल्यानंतर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 06:48 PM2021-06-07T18:48:29+5:302021-06-07T18:49:16+5:30

whatsapp join usJoin us
IPL 14 Season to resume on September 19 and final on October 15 | IPL 2021 Schedule: दे घुमाके! 'आयपीएल'च्या नव्या तारखा ठरल्या, दसऱ्याला रंगणार अंतिम सामना

IPL 2021 Schedule: दे घुमाके! 'आयपीएल'च्या नव्या तारखा ठरल्या, दसऱ्याला रंगणार अंतिम सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

क्रिकेट जगतात सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून ओळख असलेली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) यावेळी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आळी होती. २९ सामने झाल्यानंतर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. पण उर्वरित सामने याच वर्षी होणार असल्याचं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं होतं. अखेर आज आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 

आयपीएलच्या १४ व्या पर्वातील उर्वरित सामने यूएईमध्ये होणार असून १९ सप्टेंबरपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. याच दिवशी दसरा सण देखील आहे. 

आयपीएलच्या नव्या तारखांबाबतचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. "बीसीसीआय आणि युएई क्रिकेट बोर्ड यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे बीसीसीआयला यूएईमध्ये आयपीएल उत्तमरित्या पार पडेल असा विश्वास आहे. तसेच  परदेशी खेळाडूंच्या आयपीएलमध्ये खेळण्याच्या प्रश्नावर संबंधित क्रिकेट बोर्डांशी चर्चा सुरू आहे", असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. 

परदेशी खेळाडूंचं काय?
आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंचा मुद्दा अत्यंत महत्वाचा असणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा आयपीएलमधून अनेक परदेशी खेळाडूंनी स्पर्धा स्थगित होण्याआधीच माघार घेतली होती. त्यामुळे उर्वरित आयपीएल खेळविण्याआधी संबंधित क्रिकेट बोर्डांकडून खेळाडूंना यावेळी परवानगी दिली जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पण परदेशी खेळाडूंबाबत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही असा विश्वास बीसीसीआयनं व्यक्त केला आहे. 
 

Web Title: IPL 14 Season to resume on September 19 and final on October 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.