Join us  

डाव्यांचा दिवस; सर्वोत्तम लेफ्टी क्रिकेटपटूंत टीम इंडियाचे तीन शिलेदार

जगभरात आज 13 अ‍ॅागस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 4:32 PM

Open in App

नवी दिल्ली: जगभरात आज 13 अ‍ॅागस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच डाव्या हाताने लिहणारे, जेवणारे आणि खेळणाऱ्यांची  विश्वभरात असलेल्या एकुण लोकसंख्येमध्ये 10 टक्के लोकं आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अनेक डावखुरे क्रिकेटपटूंनी आपली छाप सोडली आहे. 

त्यामुळे आंतरराष्ट्रीय डावखुरा दिनानिमित्त क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम 11 डावखुरे क्रिकेटपटूंची यादी बनवली असून यामध्ये 3 भारतीय क्रिकेटपटूंचा सामावेश आहे.  या यादीत भारताचा माजी फलंदाज सौरव गांगुली, अष्टपैलू युवराज सिंग आणि वेगवान गोलंदाज जाहिर खान यांचा समावेश आहे.  यामध्ये सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18575 धावा केल्या आहेत. तसेच युवराजने  11758 धावांसह 148 विकेट्स घेतल्या आहेत, आणि जाहिर खानने 610 विकेट्स टिपल्या आहेत. 

जगभरातील सर्वोत्तम 11 डावखुरे क्रिकेटपटूंची यादि पुढील प्रमाणे आहे. 

सलामी फलंदाज -  मैथ्यू हेडन, सौरव गांगुली

मधली फळी- कुमार संगाकारा, ब्रायन लारा, एडम गिलक्रिस्ट 

अष्टपैलू- युवराज सिंग, शाकिब अल हसन

गोलंदाज- डेनियल विटोरी, जाहिर खान, वासिम अकरम, मिचेल जॅान्सन 

टॅग्स :भारतयुवराज सिंगसौरभ गांगुलीझहीर खान