Join us  

...त्यापेक्षा हे दूध भुकेल्या मुलांना द्या; भारतीय क्रिकेटपटूचा 'स्वाभिमानी शेतकऱ्यां'ना सल्ला

दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी ‘दूध बंद’ आंदोलनाची हाक दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 4:22 PM

Open in App

दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी ‘दूध बंद’ आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला सुरुवात झाली असून आज सकाळी स्वाभिनानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळुरु महामार्गावरील येल्लूर फाट्याजवळ गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला.  सांगलीपाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातही टँकर फोडाफोडी सुरु केली आहे. येथील बिद्री या ठिकाणी गोकुळचा टँकर फोडला. तर नांदणी येथे भैरवनाथाला दुधाचा अभिषेक घालून स्वाभिनानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनाबाबत भारताचा माजी क्रिकेटपटूनं परखड मत व्यक्त केलं आहे.  घसरलेल्या दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ‘कोरोना’मुळे चार महिन्यांपासून दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटली आहे आणि त्यामुळे दूध संघाने दूध खरेदी दर कमी केले आहेत. दुधाला वाजवी दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे, अशी मागणी करत आहेत. या विविध समस्यांच्या अनुषंगाने शेतकरी आणि दूध संघाचे प्रश्न समजावून घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचा माजी कसोटीपटू आकाश चोप्रानं ट्विट करून मत व्यक्त केलं की,''तुम्हाला जमेल तोपर्यंत लढा द्या. आंदोलन करा आणि मागणी करा, परंतु अशा प्रकारे दूध वाया घालवू नया. त्यापेक्षा हे दूध उपाशी मुलांना द्या.''

पाकिस्तानला मोठा धक्का; चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह सापडला गोलंदाज 

आशिया चषक, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द, तरीही 'IPL 2020'च्या मार्गातील अडथळे कायम! 

Big News : सहा महिन्यांत दोन वेळा रंगणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर 

सौरव गांगुलीची विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फेटाळली; टीम इंडियाला करावी लागणार 'ही' गोष्ट!

ICCच्या निर्णयानं 2023मध्ये भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये बदल; 36 वर्षांनी जुळून येईल योगायोग

बेन स्टोक्सचा पराक्रम; 14वर्षानंतर ICC Rankingमध्ये इंग्लंडच्या खेळाडूनं मिळवलं मानाचं स्थान

ICC World Test Championship: इंग्लंडची मोठी झेप; भारत अन् ऑस्ट्रेलियाच्या स्थानाला धोका?

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी नियम मोडणाऱ्या जोफ्रा आर्चरचा कोरोना रिपोर्ट आला समोर... 

टॅग्स :स्वाभिमानी शेतकरी संघटनाभारतीय क्रिकेट संघ