Join us

PAK vs ZIM: झिम्बाब्वेविरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या शादाब खानला अश्रू अनावर, पाहा Inside video

टी-20 विश्वचषकात पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 14:36 IST

Open in App

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकात पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करून पाकिस्तानला 131 धावांचे आव्हानात्मक आव्हान दिले होते. झिम्बाब्वेच्या डावात पाकिस्तानकडून मोहम्मद वसीमने घेतलेल्या 4 विकेटमुळे झिम्बाब्बेच्या संघाच्या फलंदाजीची कंबर मोडली होती. मात्र 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला देखील घाम फुटला. अखेर झिम्बाब्वेने अखेरच्या चेंडूवर शानदार विजय मिळवून इतिहास रचला. 

दरम्यान, पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव झाल्याने पाकिस्तानी माजी खेळाडूंनी पीसीबीवर सडकून टीका केली आहे. तर कर्णधार बाबर आझमला देखील ट्रोल केले जात आहे. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करून 20 षटकांत 8 बाद 130 धावा केल्या होत्या. पाकिस्तानी गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर झिम्बाब्वेचा टिकाव लागला नाही. तरीदेखील झिम्बाब्वेने पाकिस्तानला विजयासाठी 131 धावांचे आव्हान दिले होते, ज्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली. 

शादाब खानला अश्रू अनावर लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी संघाचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानला अश्रू अनावर झाले. शादाब खान रडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीमने सर्वाधिक 44 धावा केल्या होत्या. पाकिस्तानला देखील सुरूवातीपासून मोठे झटके बसले. मोहम्मद रिझवान (14), कर्णधार बाबर आझम (4), शान मसूद (44), इफ्तिखार अहमद (5), शादाब खान (17) आणि हैदर अली (0) धावा करून बाद झाला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने सर्वाधिक 3 बळी पटकावले. तर ब्लेसिंग मुझरबानी, ब्रॅड इव्हान्स आणि ल्यूक जोंगवे यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. 

पाकिस्तानचा अखेरच्या चेंडूवर पराभवपाकिस्तानला अखेरच्या 9 चेंडूमध्ये 9 चेंडूत 18 धावांची गरज होती. अशातच मोहम्मद नवाजने एक शानदार षटकार ठोकला. 8 चेंडूत 12 धावांची आवश्यकता असताना नवाजने एक धाव काढून मोहम्मद वसीमला स्ट्राईक दिले. अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता होती. झिम्बाब्वेकडून शेवटचे षटक ब्रॅड इव्हान्स घेऊन आला. पहिलाच चेंडू मोहम्मद नवाजने बाउंड्रीच्या दिशेने मारला मात्र झिम्बाब्वेच्या फिल्डरने केलेल्या शानदार फिल्डिंगमुळे चौकार वाचला या चेंडूवर पाकिस्तानने 3 धावा खेचल्या. दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद वसीमने चौकार ठोकून विजयाकडे कूच केली. तिसऱ्या चेंडूवर वसीमने एक धाव काढून मोहम्मद नवाजला स्टाईक दिले. आता 3 चेंडूत 3 धावांची गरज असताना तिसरा चेंडू डॉट गेला. 2 चेंडूत 3 धावांची गरज होती, दुसऱ्या चेंडूवर नवाज बाद झाला आणि झिम्बाब्वेने सामन्यात पुनरागमन केले. अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी 3 धावांची आवश्यकता होती, शाहिन आफ्रिदीने अखेरच्या चेंडूवर आफ्रिदीने एक धाव काढली आणि दुसरी धाव काढताना शाहिन आफ्रिदी धावबाद झाला. अखेर झिम्बाब्वेने विजयावर शिक्कामोर्तब केला आणि ऐतिहासिक कामगिरी केली. आक्रमक वाटणारा मोहम्मद नवाज अखेरच्या षटकात झेलबाद झाला. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानझिम्बाब्वेबाबर आजम
Open in App