Join us
Daily Top 2Weekly Top 5

इशांत शर्मा झाला नवा कर्णधार, दिल्लीच्या या खेळाडूच्या जागेवर लागली वर्णी

भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माला कर्णधारपद मिळाले आहे. दिल्लीच्या धाकड फलंदाजाच्या जागेवर त्याची वर्णी लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 00:01 IST

Open in App

नवी दिल्ली, दि. 22 - भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माला कर्णधारपद मिळाले आहे. दिल्लीच्या धाकड फलंदाजाच्या जागेवर त्याची वर्णी लागली आहे. तो दिल्ली रणजी संघाचा कर्णधार झाला आहे. दिल्ली रणजीच्या निवड समितीने यंदा गौतम गंभीरला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मोकळं करण्याचा निर्णय घेत संघात काही नवीन आणि तरुण खेळाडूंना जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. गौतम गंभीर आणि उन्मुक्त चंद यांच्याकडे सलामीवीर म्हणून यंदाच्या हंगामात जबाबदारी दिली आहे. याशिवाय ऋषभ पंत याच्याकडे संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. तर याचसोबत 19 वर्षाखालील संघातील काही खेळाडूंनाही संघात जागा देण्यात आला आहे.

इशांत शर्माची कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर यावर गौतम गंभीरनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, दिल्ली निवड समितीचे प्रमुख अतुल वासन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गौतम गंभीरनं अधिकाधिक धावा कराव्यात म्हणून त्याला कर्णधारपदातून मुक्त केलं आहे. इशांत शर्माकडे कर्णधारपदाचा कोणताही अनुभव नसला तरीही गौतम गंभीर त्याच्या मदतीला असल्याने संघात फारश्या समस्या निर्माण होणार नाहीत.दिल्लीचा रणजी संघ -इशांत शर्मा (कर्णधार), गौतम गंभीर, उन्मुक्त चंद, नितीश राणा, ध्रुव शौरी, मिलींद कुमार, हिम्मत सिंह, कुणाल चंदेला, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मनन शर्मा, विकास मिश्रा, पुलकीत नारंग, नवदीप सैनी, विकास टोकस, कुलवंत खजोरीया.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय