Join us  

दुखापतग्रस्त मयांक चालतो, तर रोहित का नाही?; माजी क्रिकेटपटूने उपस्थित केला प्रश्न

बीसीसीआयनेने सोमवारी रात्री ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 12:47 PM

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघावर अनेक प्रश्न उपस्थित होत असून अनेक माजी क्रिकेटपटूंनी यावर टीकाही केली आहे. दुखापतीचे कारण देत हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) या दौऱ्यासाठी निवडण्यात आले नाही. यावर माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मोठी टीका केली. आता माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा (Pragyan Oza)  यानेही या निर्णयावर टीका करताना, ‘दुखापतग्रस्त मयांक अगरवाल ऑस्ट्रेलिया  दौऱ्यासाठी चालतो, तर रोहित शर्मा का नाही?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.

बीसीसीआयने ने सोमवारी रात्री ऑस्ट्रेलिया  दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. आयपीएल संपल्यानंतर यूएईवरुनच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. परंतु या दौऱ्यासाठी निवडलेला संघ पाहून सर्व चाहत्यांना धक्काही बसला. कारण ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा या दौºयासाठी समावेश करण्यात आलेला नाही. त्याचवेळी, रोहित मात्र मुंबई इंडियन्सच्या नेट्स प्रॅक्टिसमध्ये सहभागी झाल्याचे समोर आले. यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबत मोठी चर्चा सुरु झाली.

भारताच्या संघात एकदिवसीय आणि टी-२० सामन्यासाठी दुखापतग्रस्त रोहित ऐवजी लोकेश राहुलची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली. मात्र, जेव्हा बीसीसीआयने संघाची घोषणा केली, तेव्हा रोहित मुंबई इंडियन्सच्या नेट्स प्रॅक्टिसमध्ये चांगल्याप्रकारे फटकेबाजी करत होता. या सरावाचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत हँडलवर पोस्टही केला होता.

यावर आता माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने म्हटले की, ‘संघाची झलेली निवड पाहून मी हैरान झालो. कारण मयांक अग्रवालही हॅमस्ट्रिंगच्या समस्याने त्रस्त आहे. परंतु, तरीही त्याची तिन्ही संघांमध्ये निवड झालेली आहे. तर मग रोहित का नाही? मला विश्वास आहे की, रोहितची या दौऱ्यासाठी तिन्ही संघात निवड होईल. कारण ऑस्ट्रेलियामध्ये वर्चस्व राखण्याची त्याची क्षमता आहे.’ ओझा पुढे म्हणाला की, ‘अचानकपणे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी लोकेश राहुलकडे देण्यात आली. जर रोहितचे संघात पुनरागमन झाले, तर यामुळे संभ्रमाचे वातावरण नाही का होणार?’ 

टॅग्स :रोहित शर्मामयांक अग्रवालभारतआॅस्ट्रेलियाबीसीसीआय