INDWvsNZW, Live Updates : Pooja Vastrakar ने केला भारी Run Out; भारताला विजय मिळवून देण्यासाठी सारे प्रयत्न केले पण... Video

ICC Women's World Cup , India Women's vs New Zealand Women's : भारतीय महिला संघाला आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 04:46 PM2022-03-10T16:46:33+5:302022-03-10T16:50:41+5:30

whatsapp join usJoin us
INDWvsNZW, Live Updates : Pooja Vastrakar's Stunning Direct Hit That Gave India Early Breakthrough Against New Zealand In Women's World Cup, but... Watch video | INDWvsNZW, Live Updates : Pooja Vastrakar ने केला भारी Run Out; भारताला विजय मिळवून देण्यासाठी सारे प्रयत्न केले पण... Video

INDWvsNZW, Live Updates : Pooja Vastrakar ने केला भारी Run Out; भारताला विजय मिळवून देण्यासाठी सारे प्रयत्न केले पण... Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Women's World Cup , India Women's vs New Zealand Women's : भारतीय महिला संघाला आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडच्या २६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला १९८ धावाच करता आल्या. हरमनप्रीत कौरच्या ७१ धावांची खेळी व्यर्थ ठरली. पाकिस्तानविरुद्ध मॅच विनिंग कामगिरी करणाऱ्या पूजा वस्त्राकरने  ( Pooja Vastrakar) याही सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. न्यूझीलंडच्या चार प्रमुख खेळाडूंना बाद करण्यासह पूजाने क्षेत्ररक्षणात सुरेख कामगिरी बजावली. न्यूझीलंडच्या डावातील तिसऱ्या षटकात पूजाने दाखवलेल्या अचूकतेचं सारे कौतुक करत आहे. तिने डायरेक्ट हिट करताना न्यूझीलंडची ओपनर सुझी बेट्सला Run Out केले.  

कर्णधार सोफी डेव्हिन आणि अॅमेलिया केर यांनी किवींचा डाव सावरला. वस्त्राकरने ही भागीदारी तोडताना डेव्हिनला ३५ धावांवर माघारी पाठवले. पण, त्यानंतर केर व अॅमी सॅटरवेट यांनी वैयक्तिक अर्धशतकं पूर्ण केली. केर ६४ चेंडूंत ५० धावांवर बाद झाली. ८४ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ७५ धावा करणाऱ्या सॅटरवेटची विकेट वस्त्राकरने घेतली. मॅडी ग्रीन ( २७) व कॅटी मार्टीन ( ४१) यांनी अखेरच्या षटकांत चांगला खेळ करताना संघाला ९ बाद २६० धावांपर्यंत मजल मारून दिली. वस्त्राकरने १० षटकांत ३४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. राजेश्वरी गायकवाडने दोन, तर झुलन गोस्वामी व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. 

शेफाली वर्माच्या जागी आज यास्तिका भाटीयाला संधी मिळाली. तिने चांगला खेळ केला, परंतु समोरून त्यांना चांगली साथ मिळाली नाही. स्मृती मानधना ( ६) व दीप्ती शर्मा ( ५) आज अपयशी ठरल्या. भाटीया २८ धावांवर बाद झाल्यानंतर मिताली राज व हरमनप्रीत कौर यांनी संघाचा डाव सावरला होता. अॅमीली केरने सलग दोन धक्के देताना भारताचा पराभव पक्का केला. मिताली ३१ व रिचा घोष शून्य धावांवर बाद झाली. स्नेह राणा ( १८) व पूजा वस्त्राकर ( ६) या मागील सामन्यांतील स्टार आज अपयशी ठरल्या. हरमनप्रीत ६३ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७१ धावांवर माघारी परतली आणि भारताचा पराभव निश्चित झाला. 

Web Title: INDWvsNZW, Live Updates : Pooja Vastrakar's Stunning Direct Hit That Gave India Early Breakthrough Against New Zealand In Women's World Cup, but... Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.