INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

INDW vs PAKW Live: महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 18:33 IST2025-10-05T18:31:49+5:302025-10-05T18:33:07+5:30

whatsapp join usJoin us
INDW vs PAKW: Suddenly white smoke spread across the field..: What exactly happened in the India-Pakistan match? | INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

INDW vs PAKW Live: महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होत आहे. मात्र, श्रीलंकेतील कोलंबोमध्ये सुरू असलेला सामन्यात एक विचित्र घटना घडली. मैदानावर अचानक मोठ्या प्रमाणात कीटक (bugs) येऊ लागल्याने खेळाडू  त्रस्त झाले. गोलंदाजी आणि फलंदाजी करण्यात खेळाडूंना त्रास होत असल्याने सामना काही काळ थांबवण्यात आला.

IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

मैदानावर अचानक हजारो किटक आल्यामुळे पाकिस्तानी पाकिस्तानी खेळाडूंना गोलंदाजी करताना त्रास होऊ लागला. सुरुवातीला पाक खेळाडूंनी एका स्प्रे बॉटलने किटकांना घालवण्याचा प्रयत्न केला, पण कीटक वाढल्यानंतर सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. 34 व्या षटकानंतर भारताचा स्कोअर 154 धावा झाला होता, यावेळी सामना सुमारे पंधरा मिनिटांसाठी थांबवण्यात आला. त्यानंतर ग्राऊंड स्टाफने संपूर्ण मैदानावर ‘बग स्प्रे’ (कीटकनाशक फवारणी) केली. यादरम्यान, मैदानावर सर्वत्र पांढरा धूर पसरलेला पाहायला मिळाला.

अशा प्रकारची घटना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अत्यंत दुर्मिळ मानली जाते. खेळ थांबण्यापूर्वी भारताची हरलीन देओल 46 धावांवर बाद झाली होती. खेळ पुन्हा सुरू होताच जेमिमा रॉड्रिग्ज 32 धावांवर बाद झाली. भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना पुन्हा एकदा अपयशी ठरली. अवघ्या 23 धावांवर स्मृती बाद झाली. तर, भारतीय कर्णधार हरमणप्रीत कौरदेखील अवघ्या 19 धावांवर आउट झाली.

Web Title: INDW vs PAKW: Suddenly white smoke spread across the field..: What exactly happened in the India-Pakistan match?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.