Join us  

INDW vs AUSW: लक्ष्य ३३९! ऑस्ट्रेलियानं रचला इतिहास; भारताची खराब फिल्डिंग अन् २८ अतिरिक्त धावा

INDW vs AUSW 3rd Live: भारतीय महिला संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध वन डे मालिका खेळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 5:38 PM

Open in App

INDW vs AUSW 3rd Live Updates | मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आज मैदानात उतरला आहे. पण, ऑस्ट्रेलियाचा महिला संघ नेहमीप्रमाणे आजही यजमानांवर भारी पडला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघात वन डे मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकून पाहुण्या संघाने २-० ने विजयी आघाडी घेतली. त्यामुळे आजचा सामना म्हणजे भारतीय संघाची अस्तित्वाची लढाईच... लक्षणीय बाब म्हणजे भारताला मागील नऊ वन डे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आहे. आज तर कांगारूंच्या संघाने ऐतिहासिक खेळी करत ३०० पार धावसंख्या नेली.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकांत ७ बाद ३३८ धावा केल्या. त्यामुळे भारताला विजय मिळवण्यासाठी तब्बल ३३८ धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाकडून Phoebe Litchfieldने सर्वाधिक (११९) धावा केल्या, तर कर्णधार लिसा हिलीने ८२ धावांची खेळी करून यजमानांचा चांगलाच समाचार घेतला. हिली आणि फोबी वगळता इतर एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. पण, भारताचे खराब क्षेत्ररक्षण आजही पाहायला मिळाले. भारतीय संघाने आज तब्बल २८ अतिरिक्त धावा दिल्या. तसेच उपकर्णधार स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांनी सोपा झेल सोडला. 

दरम्यान, पहिला सामना एकतर्फी झाला अन् ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली. पण, दुसऱ्या सामन्यात रिचा घोषने मोठी खेळी करून भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. परंतु, आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात रिचाला अपयश आले. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मानधना, यास्तिका भाटिया, रिचा घोष, मन्नत कश्यप, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, श्रेयांका पाटील, रेणुका सिंग. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय महिला क्रिकेट संघहरनमप्रीत कौरस्मृती मानधना