आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020 : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत भारताचा पराभव करत बांगलादेशने 19 वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील बांगलादेशचे हे पहिलेच विजेतेपद आहे. या विजेतेपदाबरोबरच बांगलादेशने अजून एक मोठा इतिहास रचला आहे. तो इतिहास म्हणजे बांगलादेशचे आयसीसीच्या कुठल्याही स्पर्धेतील हे पहिलेच विजेतेपद आहे. बांगलादेशचा 19 वर्षांखालील संघ पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीप पोहोचला होता. दरम्यान, भारताच्या बलाढ्य संघाला मात देत बांगलादेशने विजेतेपद पटकावले.
युवा (१९-वर्षांखालील) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेर बांगलादेशनेभारतावर विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या होत्या. बांगलादेशच्या संघाला या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला, पण अखेर त्यांनीच डकवर्थ-लुईस नियमांनुसार विजय साकारला. या सामन्यात भारतीय संघाला एक मोठी चूक भोवल्याचे पाहायला मिळाले. या एका चुकीमुळेच भारताला विश्वचषक गमवावा लागला. बांगलादेशने जिंकलेला हा पहिला युवा विश्वचषक आहे.
भारताच्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने चांगली सुरुवात केली होती. बांगलादेशच्या सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी रचली होती. पण रवी बिश्णोईने यावेळी मॅजिक स्पेल टाकला आणि चक्क चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. रवीच्या या स्पेलने सामन्याचे रुप बदलले. त्यानंतर सुशांत मिश्राने दोन बळी मिळवले आणि बांगलादेशची बिनबाद ५० वरून ६ बाद १०२ अशी अवस्था झाली. पण त्यानंतर कर्णधार अकबर अली आणि परवेझ हुसेन इमॉन यांनी चांगली भागीदारी रचली आणि सामना पुन्हा बांगलादेशच्या बाजूने झुकला.
अकबर आणि परवेझ यांची भागीदारी रंगत होती. पण यावेळी भारताचा कर्णधार प्रियांक गर्गने यशस्वीच्या हातात चेंडू सुपूर्द केला. यशस्वीने यावेळी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला आणि परवेझच्या रुपात संघाला मोठे यश मिळवून दिले. परवेझने सात चौकारांच्या जोरावर ४७ धावा केल्या. ही जोडी फुटल्यावर सामना दोलायमान अवस्थेत होता. कारण कर्णधार अकबर हा सावधपणे फलंदाजी करत बांगलादेशला विजयासमीप घेऊन जात होता.