भारताच्या युवा क्रिकेट संघाचा दमदार विजय

भारताच्या युवा (19-वर्षांखालील) क्रिकेट संघाने यजमान श्रीलंकेच्या संघाचा पहिल्या सामन्यात 1 डाव आणि 21 धावांनी पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 15:57 IST2018-07-20T15:57:13+5:302018-07-20T15:57:46+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India's young cricket team's strong victory | भारताच्या युवा क्रिकेट संघाचा दमदार विजय

भारताच्या युवा क्रिकेट संघाचा दमदार विजय

ठळक मुद्देया विजयात मोहित जांगराने महत्त्वाची भूमिका बजावली. मोहितने श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना 75 धावांमध्ये तंबूत धाडले

कोलंबो : भारताच्या युवा (19-वर्षांखालील) क्रिकेट संघाने यजमान श्रीलंकेच्या संघाचा पहिल्या सामन्यात 1 डाव आणि 21 धावांनी पराभव केला. भारताने श्रीलंकेचा दुसरा डाव 324 धावांवर संपुष्टात आणला आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताने पहिल्या डावात 589 धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेला दुसऱ्या डावात 324 धावाच करता आल्या आणि भारताने विजय साजरा केला. भारताच्या या विजयात मोहित जांगराने महत्त्वाची भूमिका बजावली. मोहितने श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना 75 धावांमध्ये तंबूत धाडले आणि भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

Web Title: India's young cricket team's strong victory