Join us

भारताचे जागतिक कसोटीतील अव्वल स्थान अधिक भक्कम

भारताने रविवारी येथे बांगलादेशविरुद्ध २-० ने कसोटी मालिका जिंकत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावरील आपली स्थिती अधिक मजबूत केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 05:40 IST

Open in App

कोलकाता : भारताने रविवारी येथे बांगलादेशविरुद्ध २-० ने कसोटी मालिका जिंकत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावरील आपली स्थिती अधिक मजबूत केली. ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटीमध्ये डावाने विजय मिळवत भारताने आपली गुणसंख्या ३६० केली. भारताने नऊ संघाच्या या अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आतापर्यंत गुण गमावलेला नाही.भारताने वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीत २-० ने पराभूत केल्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा ३-० ने पराभव केला आणि आता बांगलादेशविरुद्ध २-० ने विजय मिळवला. प्रत्येक मालिकेदरम्यान १२० गुण डावावर असतात आणि मालिकेतील सामन्यांच्या संख्येच्या आधारावर अंक निश्चित होतात.दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक सामन्यासाठी ६० गुण, तर पाच सामन्यांच्या मालिकेसाठी प्रत्येक सामन्यात २४ गुण असतात.पाकिस्तानविरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर बलाढ्य आॅस्ट्रेलिया संघ ११६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आॅस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यादरम्यान यापूर्वी झालेली अ‍ॅशेस मालिका २-२ ने बरोबरीत संपली होती. त्यानंतर दोन्ही संघांचे ५६-५६ असे समान गुण होते.पाकिस्तान संघ या दौºयातून आॅस्ट्रेलियामध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या माध्यमातून आपली पहिली मालिका खेळत आहे. पाकिस्तान संघाने अद्याप आपल्या गुणांचे खाते उघडलेले नाही. (वृत्तसंस्था)बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांना आपल्या पहिल्या मालिकेत एकाही गुणाची कमाई करता आली नाही. साखळी फेरीअखेर अव्वल दोन संघ जून २०२१ मध्ये ब्रिटनमध्ये अंतिम फेरीमध्ये खेळतील. त्यातीत विजेता संघ जागतिक कसोटी चॅम्पियन ठरेल.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ