India's T20 World Cup Squad Press Conference Live Updates - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा झाल्यानंतर आज निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) आणि कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दोघांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. या संघाच्या निवडीपूर्वी हार्दिक पांड्याचा फॉर्म, विराट कोहलीचा स्ट्राईक रेट असे अनेक मुद्दे चर्चेत होते. आज त्यावरून रोहित व अजित यांना प्रश्न विचारले गेले. रोहितने नेहमी प्रमाणे त्याच्या पत्रकार परिषदेतून फिरकी घेण्याचे सत्र सुरू ठेवले आणि विराट च्या स्ट्राईक रेटवर भारी रिअॅक्शन दिली.
रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
पत्रकाराने जेव्हा जसप्रीत बुमराहचा गोलंदाज पार्टनर कोण असेल असे विचारले तेव्हा रोहित म्हणाला, ५ तारखेला मॅच होणार आहे, मी आत्ताच बोलून काय करू? ही पत्रकार परिषद नक्कीच प्रतिस्पर्धी ऐकत असतील. ( रोहितच्या या उत्तरावर हश्शा पिकला). मला संघात ४ फिरकीपटू आणि ३ जलदगती गोलंदाज हवे होते. कुलदीप व चहल यांना पुन्हा एकत्र खेळण्याची चांगली संधी आहे. मला ऑफ स्पिनर हवा होता आणि वॉशिंग्टन सुंदरचं नाव डोक्यात होतं, परंतु दुर्दैवाने तो जास्त क्रिकेट खेळलेला नव्हता. अशा परिस्थिती अश्विन व अक्षर हे पर्याय होते. अक्षरने सातत्याने संघासोबत खेळतोय आणि त्याने चांगली कामगिरी केली आहे.
विराटच्या स्ट्राईक रेटची बरीच चर्चा रंगली आहे. आयपीएल २०२४ मध्ये त्याने पाचशे धावा केल्या असल्या तरी त्याचा स्ट्राईक रेट फार चांगला नाही. यावर प्रश्न विचारताच रोहित व आगरकर दोघांनाही हसू आवरले नाही.
भारतीय संघाचे वेळापत्रक
५ जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
९ जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
१२ जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
१५ जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा
भारताचा वर्ल्ड कप संघ -
रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पांड्या ( उप कर्णधार),
विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह; राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद