India's T20 World Cup Squad Press Conference Live Updates - भारतीय संघ आयसीसी स्पर्धेचा ११ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे. संघ जाहीर झाल्यानंतर आज निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) आणि कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली...
Rohit Sharma Press Conference
- "जेव्हा T20 विश्वचषक होत होता, तेव्हा आम्ही खूप ट्वेंटी-२० सामन्यांना मुकलो. कसोटी क्रिकेट हा एक फॉरमॅट आहे जो तुम्हाला चुकवायचा नाही आणि त्याला प्राधान्य द्यायचे होते. आम्ही खेळाडू आणि प्रशिक्षकांशीही याबद्दल चर्चा केली. अजित नंतर आला आणि त्यामुळे त्याला ती चर्चा माहीत नव्हती. जो फॉरमॅटची मालिका किंवा स्पर्धा असते यानुसार आम्ही त्या फॉरमॅटला प्राधान्य देतो. ५० षटकांचा विश्वचषक होत असताना आम्ही त्या फॉर्मेटला प्राधान्य दिला,'' असे
रोहित शर्मा ट्वेंटी-२० वर्ल्ड् कपनंतर ट्वेंटी-२० सामने मुकण्याबद्दल रोहितला माहित दिली.
KL Rahul ला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी का नाही निवडले? अजित आगरकरने स्पष्ट कारण सांगितले
- "आम्ही संघ निवडताना मधल्या फळीतील चांगल्या हिटरला महत्त्व दिले. असे खेळाडू टॉप ऑर्डरला अधिक मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य देतात. त्यामुळे आम्ही शिवम दुबे सारख्या व्यक्तीची निवड केली जो आमच्यासाठी हे काम करू शकेल. आयपीएलमधील त्याची कामगिरी आणि त्याआधी त्याने राष्ट्रीय संघासाठी केलेली कामगिरी लक्षात ठेवूनच शिवमची निवड केली गेली आहे. पण, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेलच अशी हमी नाही. प्लेइंग इलेव्हन अजून आम्हाला माहित नाही आम्ही तिथे गेल्यावरच ठरवू शकतो,''असे रोहित शर्मा म्हणाला.
भारतीय संघाचे वेळापत्रक
५ जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
९ जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
१२ जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
१५ जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा
भारताचा वर्ल्ड कप संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह; राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद