कोलंबो : भारताने श्रीलंकेत सुरु असलेल्या 19-वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दमदार विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 305 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 245 धावांत संपुष्टात आला आणि भारताने 60 धावांनी दमदार विजय मिळवला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या अर्जुन आझाद आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 183 धावांची भागीदारी रचली आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. आझादने यावेळी 11 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 121 धावा केल्या. आझादला वर्माने चांगली साथ देत 10 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 110 धावा केल्या.
![]()
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला चांगली सुरुवात करता आली नाही.पाकिस्तानने सातत्याने विकेट्स गमावल्या आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. मुंबईकर फिरकीपटू अथर्व अंकोलेकरने भारतासाठी सर्वाधिक तीन बळी मिळवले.
![India U19 vs Pakistan U19: India U19 won by 60 runs | IND vs PAK, U19: à¤à¤¾à¤°à¤¤ नॠपाà¤à¤¿à¤¸à¥à¤¤à¤¾à¤¨ à¤à¥ 60 रनà¥à¤ सॠरà¥à¤à¤¦à¤¾, à¤à¤¨ बलà¥à¤²à¥à¤¬à¤¾à¤à¥à¤ à¤à¥ बà¥à¤ हà¥à¤ 183 रन à¤à¥ साà¤à¥à¤¦à¤¾à¤°à¥]()