Join us

मलिकच्या शतकाने भारताचा श्रीलंकेवर दुसरा विजय

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाच्या दीपक मलिकच्या नाबाद १०६ धावा आणि सुनील रमेशच्या नाबाद ६६ धावांच्या मदतीने भारताने २० षटकांमध्ये २ गडी गमावून २३६ धावांचे विशाल आव्हान श्रीलंकेसमोर ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 21:09 IST

Open in App
ठळक मुद्देया विजयासह भारताने श्रीलंकेवर २ - ० अशी आघाडी घेतली आहे. 

मुंबई: दीपक मलिकच्या जबरदस्त अष्टपैलू कामगिरीमुळे भारतीय दृष्टिहीन क्रिकेट संघाला सध्या सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेमध्ये श्रीलंकेच्या संघाविरुद्ध मुंबईमध्ये झालेल्या सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने श्रीलंकेवर २ - ० अशी आघाडी घेतली आहे. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाच्या दीपक मलिकच्या नाबाद १०६ धावा आणि सुनील रमेशच्या नाबाद ६६ धावांच्या मदतीने भारताने २० षटकांमध्ये २ गडी गमावून २३६ धावांचे विशाल आव्हान श्रीलंकेसमोर ठेवले. श्रीलंकेच्या संघाने पहिला गडी फक्त १२ धावांवर गमावल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी धावफलक गतिमान ठेवत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु यजमान भारतीय संघाच्या गोलंदाजीसमोर त्यांचा काही पाडाव लागला नाही आणि २० षटकांमध्ये ९ गडी गमावून २०२ धावांवर श्रीलंकेचा खेळ संपला. या सामन्यात भारतीय संघ ३४ धावांनी विजयी झाला.

टॅग्स :भारतश्रीलंका