Join us

श्रीलंकेवर विजय मिळवून भारताकडे आघाडी

डी वेंकटेश्वर याने ५० धावा करून भारतीय धावसंख्येला आकार दिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 21:07 IST

Open in App

पुणे: दृष्टिहीन क्रिकेटपटूंच्या ५ सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 मालिकेमधील पहिल्या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेला ३९ धावांनी पराभूत करून मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने २० षटकांमध्ये ६ गडी गमावून १९० धावांचे विशाल आव्हान श्रीलंकेसमोर ठेवले. डी वेंकटेश्वर याने ५० धावा करून भारतीय धावसंख्येला आकार दिला.

 जिंकण्यासाठी १९१ धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना श्रीलंकेच्या संघाला ठराविक कालांतराने बाद होत असलेल्या फलंदाजांमुळे सावरता आले नाही आणि त्यांचा खेळ २० षटकांमध्ये ९ गडी गमावून १५१ धावांवर संपला. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत भारतीय संघाला सहजपणे विजय मिळवून दिला. अजित सिल्वाने श्रीलंकेच्या संघाकडून सर्वाधिक ५७ धाव केल्या.

टॅग्स :भारतश्रीलंका