Join us  

टीम इंडियाची 'नऊ'लाई... ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडून रचला इतिहास, आता लक्ष्य विंडीज

काल झालेल्या पाचव्या वनडेत विजय मिळवत विराटसेनेनं ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 12:56 PM

Open in App

पोर्ट एलिझाबेथ - भारतीय संघ कसोटीनंतर वन-डे क्रमवारी अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून वन-डेमध्ये भारतीय संघानं आपला दबबा राखला आहे. जून 2016 पासून फेब्रुवारी 2018 या कालावधील भारतीय संघानं एकही वनडे मालिका गमावलेली नाही. यादरम्यान भारतानं नऊ वन-डे मालिका खेळल्या आहे. मायदेशासह विदेशातही भारतीय संघाने सातत्यानं आपली कामगिरी चोख बजावत विजय प्रस्थापित केले आहेत. 

काल झालेल्या पाचव्या वनडेत विजय मिळवत विराटसेनेनं ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघानं एप्रिल 2009 ते जून 2010 या कालावधीत एकापाठोपाठ 8 मालिका विजय मिळवले होते. कांगारुंचा विक्रम मोडीत काढल्यानंतर आता फक्त वेस्ट इंडिज संघाचा विक्रम भारतीय संघासमोर असेल. वेस्ट इंडिज संघानं मे 1980 ते मार्च 1988 या दरम्यान सलग 14 मालिका विजय मिळवले होते. सर्वाधिक मालिका विजय मिळवणाऱ्या संघामध्ये वेस्ट इंडिज प्रथम क्रमांकावर आहे. तर भारत दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेनं सलग सात वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या शेवटचा सामना 16 फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. 

भारतीय संघाचे मालिका विजय - 

  1. झिम्बाबेवर 3-0 विजय (झिम्बाबेत)
  2. न्यूझीलंडचा 3-2ने पराभव (भारतात)
  3. इंग्लंडचा 2-1 ने फडशा (भारतात)
  4. वेस्ट इंडिजचा 3-1ने पराभव (वेस्ट इंडिजमध्ये)
  5. श्रीलंकेचा 5-0ने फडशा (श्रीलंकेत)
  6. ऑस्ट्रेलियाचा 4-1 ने पराभव (भारतात)
  7. न्यूझीलंडचा 2-1 ने पराभव  (भारतात)
  8. श्रीलंकेचा 2-1ने पराभव  (भारतात)
  9. 2017-18 मध्ये सहा वन डे सामन्यांच्या मालिकेत 4-1 ने आघाडीवर 

 

दक्षिण आफ्रिकेतील भारताची कामगिरी  - 

  • भारताला 1992-93 साली सात वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-5 ने पराभव स्वीकारावा लागला
  • 2006-07 साली चार वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-4 ने पराभव स्वीकारावा लागला
  • 2010-11 साली पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-3 ने पराभव स्वीकारावा लागला
  • 2013-14 साली तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पराभव स्वीकारावा लागला
  • 2017-18 मध्ये सहा वन डे सामन्यांच्या मालिकेत 4-1 ने आघाडीवर 
टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८विराट कोहलीआॅस्ट्रेलिया