Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे माजी सलामीवीर रमण महिला संघाच्या प्रशिक्षकपदी

भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय समितीने रमण यांची निवड केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 18:40 IST

Open in App

मुंबई : रमेश पोवार, गॅरी कर्स्टन, वेंकटेश प्रसाद यांच्यावर मात करत भाराताचे माजी सलामीवीर डब्ल्यू व्ही. रमण यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय समितीने रमण यांची निवड केली आहे. 53 वर्षीय रमण यांनी भारतासाठी 11 कसोटी आणि 27 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 1988 ते 1997 या कालावधीमध्ये ते भारतीय संघाबरोबर होते.

महिला टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पत्करावी लागलेली हार आणि प्रशिक्षक रमेश पोवार-मिताली राज यांच्यात झालेला वाद यामुळे बीसीसीआयला नव्या प्रशिक्षकाचा शोध होता. त्यामुळे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार या तिघांव्यतिरिक्त भारताचा माजी गोलंदाज मनोज प्रभाकर, माजी क्रिकेटपटू टॉम मूडी, डेव्ह व्हॉटमोर, व्यंकटेश प्रसाद, रे जेनिंग्ज हेदेखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकापर्यंत पोवार यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ संपताच नव्याने अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार २० डिसेंबरला माजी खेळाडू कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची समिती उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराशी बीसीसीआय दोन वर्षांचा करार करणार असून त्याला वार्षिक ३ ते ४ कोटी रुपयांपर्यंत मानधन मिळेल.

पोवार-एडुल्जी यांच्यावर झाले आरोपपोवार यांना विरोध होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. पोवार व हरमनप्रीत कौर यांनी मिताली राजला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर मितालीने पोवार व डायना एडुल्जी यांच्यावर अरोप केला. पोवार यांनीही सलामीला पाठविण्यात न आल्याने मितालीने निवृत्तीची धमकी देत संघात दुफळी निर्माण केल्याचा आरोप करताच वादाला वेगळे वळण लागले

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघकपिल देव