Join us

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताला मोठा धक्का; 'हा' स्टार वेगवान गोलंदाज झाला जखमी

दुसऱ्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आणि तिसऱ्या सामन्यात त्याला खेळता आले नाही. पण आता तर भारताचा स्टार गोलंदाज जायबंदी झाल्याचे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 17:30 IST

Open in App

मुंबई : न्यूझीलंड दौऱ्याला जाण्यापूर्वीच भारताला काही धक्के बसत आहेत. या दौऱ्याला जाण्यापूर्वीच भारताचा एक स्टार गोलंदाज जखमी झाल्याचे वृत्त आले आहे.

न्यूझीलंडच्या दौऱ्यापूर्वी भारताचे तीन खेळाडू जायबंदी झाले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रिषभ पंत जायबंदी झाला, त्यानंतर तो भारतीय संघाला दिसला नाही. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आणि तिसऱ्या सामन्यात त्याला खेळता आले नाही. पण आता तर भारताचा स्टार गोलंदाज जायबंदी झाल्याचे म्हटले जात आहे.

सध्याच्या घडीला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. या सामन्यात दिल्लीकडून खेळताना वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. या दुखापतीचे स्वरुप अजून कळू शकलेले नाही. पण या दुखापतीनंतर डॉक्टरांच्या मदतीने इशांत मैदान सोडावे लागले होते.

टॅग्स :इशांत शर्माभारतन्यूझीलंडरिषभ पंतशिखर धवन