IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियात होऊ शकतात मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 20:32 IST2025-07-17T20:29:19+5:302025-07-17T20:32:35+5:30

whatsapp join usJoin us
India’s assistant coach all but confirms Jasprit Bumrah will play 4th Test against England in Manchester | IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट

IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Jasprit Bumrah Set To Play Manchester Test :  लॉर्ड्स कसोटी सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघ अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील मालिकेत १-२ अशा पिछाडीवर आहे. मालिकेत कमबॅक करण्यासाठी टीम इंडियाला मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात खेळवण्यात येणारा चौथा कसोटी सामना काहीही करून जिंकावाच लागेल. मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या सामन्यात जसप्रीत बुमरा खेळणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आहे. यासंदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

बुमराहसंदर्भात प्रशिक्षकांनी दिली हिंट 

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटी सामन्यात खेळणं जवळपास निश्चित झाले आहे. अर्शदीप सिंगच्या दुखापतीसंदर्भातील माहिती देताना भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन  टेन डोशेट यांनी चौथ्या कसोटी सामन्यात प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार असल्याची हिंट दिली आहे.

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!

नेमकं काय म्हणाले प्रशिक्षक?

अर्शदीप सिंगच्या दुखापतीसंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी जसप्रीत बुमराहच्या उपलब्धतेसंदर्भातही मत मांडले. ते म्हणाले की, बुमराह कसोटी मालिकेतील उर्वरित २ पैकी एका सामन्यात खेळणार आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मँचेस्टर कसोटी सामना मालिकेतील महत्त्वपूर्ण सामना असल्यामुळे तो या सामन्यात खेळवण्याची शक्यता अधिक आहे.

अर्शदीप सिंंगचं काय?

अर्शदीप सिंग हा इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघातील प्रमुख खेळाडू आहे. पण अद्याप त्याला एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही. उर्वरित दोन सामन्यात त्याची टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री होईल, असे वाटत असताना हा गोलंदाज दुखापतीने त्रस्त आहे. नेट्समध्ये  सराव करताना फॉलो थ्रूमध्ये साई सुदर्शनने मारलेला फटका अडवताना अर्शदीपच्या हाताला दुखापत झालीये. २६ वर्षीय गोलंदाजांच्या हाताला टाके पडले असून त्याची खेळण्याची शक्यता धूसर होताना दिसतोय.

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियात होऊ शकतात मोठे बदल

लॉर्ड्सच्या पराभवानंतर भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदलही पाहायला मिळू शकतात. फलंदाजीमध्ये करूण नायरच्या जागी साई सुदर्शनला संधी दिली जाऊ शकते. याशिवाय गोलंदाजीत कुलदीप यादव याच्यावर संघ भरवसा दाखवणार का? तेही पाहण्याजोगे असेल.

Web Title: India’s assistant coach all but confirms Jasprit Bumrah will play 4th Test against England in Manchester

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.