ठळक मुद्देभारताने श्रीलंकेवर फॉलोऑन लादला. त्यानंतर श्रीलंकेचा दुसरा डाव 150 धावांत आटोपत भारताने दमदार विजय मिळवला.
कोलंबो : भारताच्या युवा (19-वर्षांखालील) भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघावर दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा एक डाव आणि 117 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 असे निर्विवाद वर्चस्व राखले.
भारताने पहिल्या डावात पवन शहाच्या दमदार द्विशतकी खेळीच्या जोरावर 613 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव 316 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर भारताने श्रीलंकेवर फॉलोऑन लादला. त्यानंतर श्रीलंकेचा दुसरा डाव 150 धावांत आटोपत भारताने दमदार विजय मिळवला.