Join us

भारतीय महिला क्रिकेट संघाला अखेर कोच सापडला, शोध मुंबईत संपला?

तुषार आरोठे यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय क्रिकेट महिला संघाच्या प्रशिक्षकपदाचा शोध गेले कित्तेक दिवस सुरू होता. या पदासाठी अनेकांनी अर्ज केले होते आणि त्यात मुंबईच्या माजी फिरकीपटूचाही समावेश होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 12:30 IST

Open in App

मुंबई - तुषार आरोठे यांच्या राजीनाम्यानंतर भारतीयक्रिकेटमहिला संघाच्या प्रशिक्षकपदाचा शोध गेले कित्तेक दिवस सुरू होता. या पदासाठी अनेकांनी अर्ज केले होते आणि त्यात मुंबईच्या माजी फिरकीपटूचाही समावेश होता. अनेक अर्जांची पडताळणी केल्यानंतर अखेरीस भारतीयमहिलाक्रिकेट संघाला कोच सापडला आणि त्यांचा शोध मुंबईवर येऊन संपला. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार भारताच्या माजी फिरकीपटू रमेश पोवारकडे महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

40 वर्षीय पोवार सध्या भारतीय महिला संघाच्या हंगामी प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. मात्र, त्याच्याकडे 2018च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपर्यंत ही जबाबदारी कायम राहणार असल्याचे वृत्तातून सांगण्यात आले आहे. पोवारच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत आहे. अन्य एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार BCCIने या पदासाठी अंतिम सहा नावांची निवड केली आहे आणि त्यात पोवारचाही समावेश आहे. या पदासाठी विराट कोहलीचे माजी प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनीही उत्सुकता दर्शवली आहे. 

आरोठे यांनी वैयक्तिक कारणास्तव गत महिन्यात प्रशिक्षकपद सोडले होते. त्यांनी हा पदभार दीड वर्ष सांभाळला. आगामी श्रीलंका दौ-यात भारतीय संघ पोवारच्या मार्गदर्शनाखाली खेळणार असल्याची शक्यता आहे. 9 नोव्हेंबरपासून टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. भारताला न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि पात्रता फेरीतून आलेल्या एका संघाचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :भारतक्रिकेटमहिलाक्रीडा