"सुवर्ण पदक जिंकणं हे एक स्वप्न होतं", आशियाई स्पर्धेतील 'सोनेरी' कामगिरीनंतर हरमन भारावली

सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 17:17 IST2023-09-28T17:16:59+5:302023-09-28T17:17:16+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Indian women's cricket team captain Harmanpreet Kaur after winning a medal at the Asian Games 2023 said winning the gold medal was a dream come true  | "सुवर्ण पदक जिंकणं हे एक स्वप्न होतं", आशियाई स्पर्धेतील 'सोनेरी' कामगिरीनंतर हरमन भारावली

"सुवर्ण पदक जिंकणं हे एक स्वप्न होतं", आशियाई स्पर्धेतील 'सोनेरी' कामगिरीनंतर हरमन भारावली

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकून भारतीय महिला संघाने तमाम भारतीयांना खुशखबर दिली. सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला आहे. चीनच्या धरतीवर ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्यानंतर भारतीय महिला संघ मायदेशात परतला आहे. मुंबई विमानतळावर संघातील शिलेदारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेला चीतपट केले आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. 

दरम्यान, आशियाई क्रीडापटूंच्या सत्कार समारंभात भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. पहिलं सुवर्ण पदक जिंकणं हे माझं स्वप्न होतं असं तिने यावेळी सांगितलं. "सुवर्ण पदक जिंकणं हा एक वेगळा अनुभव होता, मी खूप आनंदी आहे. पहिले सुवर्णपदक जिंकणे हे एक स्वप्न होते", असे हरमनने यावेळी सांगितले. 

हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारताला सुवर्ण 
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करून सुवर्ण पदक जिंकले. या विजयात स्मृती मानधनाने मोलाची भूमिका बजावली. सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत सोनेरी कामगिरी केली. भारताने सुवर्ण पदक पटकावले, तर श्रीलंकेला रौप्य आणि बांगलादेशला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात भारताने ११६ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात श्रीलंकेला निर्धारित २० षटकांत केवळ ९७ धावा करता आल्या.

Web Title: Indian women's cricket team captain Harmanpreet Kaur after winning a medal at the Asian Games 2023 said winning the gold medal was a dream come true 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.