Join us

भारतीय महिलांचा इंग्लंडवर दमदार विजय, एकचा बिश्तचे चार बळी

एकताने अचूक मारा करत 25 धावांत 4 बळी मिळवले. या नेत्रदीपक कामगिरीमुळेच एकताला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 21:31 IST

Open in App

मुंबई, भारत विरुद्ध इंग्लंड : भारतीय महिलांनी पहिला एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर 66 धावांनी दमदार विजयमिळवला. भारताच्या या विजयाची शिल्पकार ठरली ती फिरकीपटू एकता बिश्त. कारण एकताने या सामन्यात चार बळी मिळवत इंग्लंडचे कंबरडे मोडले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 202 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला 136 धावाच करता आल्या.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. भारताच्या जेमिमा रॉड्रिग्स आणि स्मृती मानधना यांनी दमदार 69 धावांची सलामी दिली. जेमिमाने यावेळी 48 आणि स्मृतीने 24 धावा केल्या. यानंतर कर्णधार मिताली राजने 44 धावांची खेळी साकारली. झुलान गोस्वामीने 30 आणि तानिया भाटियाने 25 धावा केल्या आणि त्यामुळे भारताला दोनशे धावांचा पल्ला गाठता आला.

भारताच्या गोलंदाजांपुढे 202 धावांचे आव्हान टिकवणे कठिण होते, पण अशक्यप्राय नव्हते. भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला आणि त्यामुळेच इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. एकताने अचूक मारा करत 25 धावांत 4 बळी मिळवले. या नेत्रदीपक कामगिरीमुळेच एकताला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारतइंग्लंडमिताली राज