Join us  

दहा वर्षांच्या प्रेमानंतर अखेर टीम इंडियाचा क्रिकेटपटू चढला बोहोल्यावर!

नोव्हेंबर 2019मध्ये वृद्धीमान सहा याला राखीव यष्टिरक्षक म्हणून त्याची निवड केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 1:30 PM

Open in App

भारतीय संघाचा अनकॅप यष्टिरक्षक-फलंदाज केएस भरत यानं नुकतंच लग्न केलं. 10 वर्षांच्या प्रेमानंतर 26 वर्षीय भरतने त्याची गर्लप्रेंड अंजलीशी विवाह केला. इंस्टाग्रामवर त्यानं लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. भरत हा भारत A संघाचा नियमित सदस्य आहे. त्यानं अजून राष्ट्रीय संघात पदार्पण केलेले नाही. यापूर्वी दोनवेळा त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. 

नोव्हेंबर 2019मध्ये वृद्धीमान सहा याला राखीव यष्टिरक्षक म्हणून भरतची निवड करण्यात आली होती. त्यापूरेवी जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतही त्याची निवड केली गेली होती. त्यानंतर भारत A संघासोबत तो न्यूझीलंड दौऱ्यावर खेळला.  2018च्या इंग्लंड दौऱ्यावर त्याची निवड झाली होती, परंतु त्याच्याजागी रिषभ पंतला खेळवले. दिनेश कार्तिकनं दुसऱ्या कसोटीनंतर माघार घेतली आणि रिषभला संधी मिळाली. रिषभनं या संधीचं सोन करताना संघातील स्थान भक्कम केलं. 

भरतनं 78 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 4283 धावा केल्या आहेत. आंध्रप्रदेशच्या फलंदाजानं 51 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 1351 धावा केल्या, तर 43 ट्वेटी-20 सामन्यांत 615 धावा केल्या.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Air India Express Accident : थरकाप उडवणारा प्रसंग; प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं नेमकं काय घडलं!

सॅल्यूट... दीपक साठेंच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली, वाचले अनेकांचे प्राण; भावाची हळवी पोस्ट

जय महाराष्ट्र!.... उद्धव ठाकरे पुन्हा एकदा देशातील टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये

शतकी आघाडी घेऊनही पाकिस्तानची हाराकिरी; तिसऱ्या दिवशी पडल्या 14 विकेट्स  

बोंबला! डुक्करामुळे तो विवस्त्र धावत सुटला, जाणून घ्या व्हायरल फोटोची गंमत...

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ