Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hardik Pandya, IND vs NZ: हार्दिक पांड्याच्या यंग ब्रिगेडची कमाल, टी२० क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच देश

हार्दिक पांड्याच्या टीम इंडियाने न्यूझीलंडला चारली पराभवाची धूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 09:30 IST

Open in App

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत एकही टी२० मालिका गमावलेली नाही. टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा टी२० सामना जिंकताच मालिका २-१ ने जिंकली. यापूर्वी हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिका जिंकली होती.

टीम इंडियाने केला हा करिष्मा

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा टी२० सामना १६८ धावांनी जिंकला. भारताचा T20 क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०१८ मध्ये भारताने आयर्लंडचा १४३ धावांनी पराभव केला होता. टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम श्रीलंका संघाच्या नावावर आहे. २००७ मध्ये श्रीलंकेने केनियन संघावर १७२ धावांनी विजय मिळवला होता.

आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वात मोठा विजय

2007 मध्ये श्रीलंकेने केनियाचा 172 धावांनी पराभव केलाभारताने 2023 मध्ये न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव केलापाकिस्तानने 2022 मध्ये हाँगकाँगचा 155 धावांनी पराभव केला

पहिल्यांदाच केला हा पराक्रम

भारतीय संघाने घरच्या मैदानावर आतापर्यंत ७८ टी-२० सामने खेळले आहेत. यापैकी टीम इंडियाने 50 सामने जिंकले आहेत. मायदेशात ५० टी-२० सामने जिंकणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. त्याला 26 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, दोन सामन्यांतून एकही निकाल लागला नाही. भारताने आतापर्यंत एकूण 199 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताने 127 सामने जिंकले आहेत.

भारतीय संघाने सामना जिंकला

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 234 धावांची डोंगराएवढी धावसंख्या उभारली. टीम इंडियासाठी शुभमन गिलने झंझावाती खेळी करताना 126 धावा केल्या. त्याचवेळी राहुल त्रिपाठीने 44 धावांचे योगदान दिले. अखेरीस हार्दिक पांड्याने 17 चेंडूत 30 धावा केल्या. या फलंदाजांमुळेच भारतीय संघ मोठी धावसंख्या करू शकला. तिसरा सामना जिंकताच टीम इंडियाने मालिका 2-1 अशी आपल्या नावे केली. भारतीय संघाचा टी-20 क्रिकेटमधील हा सलग 8वा मालिका विजय आहे. गोलंदाज आणि फलंदाजांनी टीम इंडियासाठी अप्रतिम खेळ दाखवला.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघ
Open in App