Join us

भारतीय संघ डिप्रेशनमध्ये होता पण त्यांनी व्याजासह परतफेड केली - शोएब अख्तर

आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर भारतीय संघावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 07:50 IST

Open in App

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर भारतीय संघावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतो आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरची भर पडली आहे. भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत जागा मिळवली. मंगळवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करून राशिद खानच्या नेतृत्वातील अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी केली.

भारतीय संघाचे अभिनंदन करताना शोएबने सोशल मीडियावर लिहिले की, वन डे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ डिप्रेशनमध्ये गेला होता. पण, शनिवारी त्यांनी पराभवाची व्याजासह परतफेड केली. मनात असलेली पराभवाची सल घेऊनच भारतीय संघ यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत होता. रोहित शर्मा, तू कमाल आहेस भावा. काय इनिंग खेळला हा माणूस. भारतीय संघाचे खूप अभिनंदन! शोएब अख्तरची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशोएब अख्तररोहित शर्माभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024