Join us  

T20 World Cup : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेला भारतीय संघ BCCI बदलू शकतात का?; काय सांगतो ICCचा नियम 

बीसीसीआयनं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघात काही आश्चर्यकारक निर्णय पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 5:28 PM

Open in App

बीसीसीआयनं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघात काही आश्चर्यकारक निर्णय पाहायला मिळाले. २०१७नंतर आर अश्विनला ट्वेंटी-२० संघात संधी मिळाली अन् तीही वर्ल्ड कप स्पर्धेसाठी. युझवेंद्र चहल, शिखर धवन, पृथ्वी शॉ यांच्या नावाचा विचारही निवड समितीनं केला नाही. चार फलंदाज, दोन यष्टिरक्षक-फलंदाज, १ जलदगती अष्टपैलू, २ फिरकी अष्टपैलू, ३ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज असा संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयनं निवडला. आता यात स्थान मिळालेल्या खेळाडूंच्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष लागणे साहजिकच होते. 

T20 World Cup 2021: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्व संघांची झाली घोषणा; जाणून घ्या कोणाचा संघ तगडा!

सूर्यकुमार यादव, इशान किशन यांन आयपीएलच्या कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त स्थान मिळाले. दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याही संघात स्थान पटकावण्यात यशस्वी ठरला. पण, या तिघांचीही सध्या आयपीएलमधील कामगिरी ही निराशाजनक झाली आहे. इशान किशन तर रविवारी RCBविरुद्धच्या लढतीनंतर रडकुंडीला आलेला दिसला. मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूला त्या सामन्यात ९ धावा करता आल्या आणि सामन्यानंतर विराटनं त्याला समजावले. सूर्यकुमारही आऊट ऑफ फॉर्म दिसतोय. हार्दिक पांड्या फिट आहे की नाही हेच समजत नाही. काल तो खेळला, परंतु ना गोलंदाजी केली, ना फलंदाजीत योगदान दिलं. त्यामुळे त्याच्या निवडीवरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे.

बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिरकीपटू कुठेय?; टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघावर IPL फ्रँचायझी मालकाची टीका

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) टीम इंडियाला मार्गदर्शन करणार आहे. तो मेंटर म्हणून भारतीय संघासोबत असणार आहे. 

भारतीय संघ ( India T20 WorldCup squad)  - 

  • आघाडीची फळी - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल
  • मधली फळी - सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन
  • अष्टपैलू खेळाडू - हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल
  • फिरकीपटू - राहुल चहर, आर अश्विन, वरुण चक्रवर्थी
  • जलदगती गोलंदाज - जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, दीपक चहर
  • संघात स्थान न मिळालेले खेळाडू - पृथ्वी शॉ, शिखर धवन, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर.

 

BCCIनं विराट कोहलीला खिजगणतीतही नाही धरलं; T20 World Cup साठी दोन मोठे निर्णय घेतले

टीम इंडियात होऊ शकतो का बदल?आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय व निवड समिती लक्ष ठेऊन आहे. त्यानुसार फॉर्मात असलेल्या खेळाडूला वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळू शकते. आयसीसीच्या नियमानुसार १० ऑक्टोबरपर्यंत सहभागी देशांना त्यांनी जाहीर केलेल्या संघांत बदल करता येणार आहे. त्यामुळे हार्दिक, सूर्यकुमार व इशान यांच्या कामगिरीत सुधारणा न झाल्यास त्यांना डच्चू मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. ( ICC has allowed participating nations to make changes to their squad till October 10 ) 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयहार्दिक पांड्यासूर्यकुमार अशोक यादवइशान किशन
Open in App