भारतीय संघाने दाखवली खरी क्षमता

भारताचा माजी यष्टिरक्षक, फलंदाज सय्यद किरमाणी यांनी कसोटी मालिका गमावल्यानंतर जोरदार मुसंडी मारणाºया भारतीय संघाची प्रशंसा केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 02:33 IST2018-02-20T02:32:08+5:302018-02-20T02:33:12+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Indian team showed true potential | भारतीय संघाने दाखवली खरी क्षमता

भारतीय संघाने दाखवली खरी क्षमता

चेन्नई : भारताचा माजी यष्टिरक्षक, फलंदाज सय्यद किरमाणी यांनी कसोटी मालिका गमावल्यानंतर जोरदार मुसंडी मारणाºया भारतीय संघाची प्रशंसा केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आपली खरी क्षमता आणि प्रतिभा एकदिवसीय मालिकेत दाखवली असल्याचे त्यांनी म्हटले.
किरमाणी म्हणाले, ‘दक्षिण आफ्रिकेत वातावरणाशी जुळवून घेण्याआधीच भारताने कसोटी मालिका गमावली. यानंतर मात्र त्यांनी जोरदार मुसंडी मारली आणि एकदिवसीय मालिकेत आपली क्षमता दाखवून मालिका सहजपणे जिंकली.’
यष्टिरक्षणातील तंत्रासह अनेक पैलूंविषयी महेंद्रसिंग धोनी याच्यावर टीका करणे योग्य नसल्याचेही किरमाणी यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, ‘हा सर्व निकालाचा खेळ आहे. जे यष्टिरक्षण व फलंदाजीविषयी धोनीची टीका करीत आहेत, त्यांना माहीत नाही की धोनीने प्रत्येक ठिकाणी निकाल दिले आहेत. आता फक्त निकाल पाहिले जातात, तंत्र नाही.’
किरमाणी यांनी धोनीच्या नेतृत्वाचीही प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘धोनी क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात भारताला अव्वल स्थानी घेऊन गेला व संघाचे आघाडीवर राहून नेतृत्व केले. त्याच्यात महान कर्णधाराच्या सर्व गुण होते. एवढं सगळ असताना धोनीच्या तांत्रिक गोष्टीवर का चर्चा केली पाहिजे. त्याने अनेक शानदार विजय मिळवून दिले असताना त्याच्यावर शंका उपस्थित करण्याची गरजच नाही. ’ (वृत्तसंस्था)

Web Title: Indian team showed true potential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.