Join us

जड्डू, रहाणे इंग्लंडमध्ये दाखल! ऑस्ट्रेलियाला पाणी पाजून 'अजिंक्य' राहण्यासाठी रोहितसेना सज्ज

team india squad for wtc : भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 19:36 IST

Open in App

नवी दिल्ली : आयपीएल २०२३ चा थरार संपल्यानंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. टप्प्याटप्प्याने टीम इंडियातील शिलेदार आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडला रवाना होत होते. आता आयपीएल 'चॅम्पियन' संघाचे खेळाडू अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा हे देखील लंडन येथे दाखल झाले आहेत. खेळाडू सराव करत असल्याची झलक बीसीसीआयने शेअर केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. 

जड्डू अन् रहाणे इंग्लंडमध्ये दाखल 

टीम इंडिया नवीन जर्सीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी भारतीय संघाच्या नवीन जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे. Adidas या किट निर्माता कंपनीने रोहित शर्मा आणि कंपनीसाठी नवीन जर्सी लॉंच केली आहे. Nike नंतर प्रथमच टीम इंडियाच्या जर्सीवर स्पॉन्सर म्हणून प्रसिद्ध क्रीडा वस्तू निर्माता कंपनी दिसणार आहे. या नव्या जर्सीत भारतीय शिलेदार ७ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध WTC फायनलमध्ये खेळणार आहेत. 

आगामी सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट. 

राखीव खेळाडू - यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.  

 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाबीसीसीआयभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेरवींद्र जडेजा
Open in App