Join us

Raghav Ajinkya Rahane: 'अजिंक्य'पुत्राची पहिली झलक पाहिली का? मराठमोळ्या नावाने वेधले लक्ष! 

Ajinkya Rahane Son Name: भारतीय संघाचा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे काही महिन्यांपूर्वीच एका मुलाचा पिता झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 14:31 IST

Open in App

मुंबई: भारतीय संघाचा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे काही महिन्यांपूर्वीच एका मुलाचा पिता झाला आहे. रहाणेने याआधीच आपल्या चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली होती, मात्र आता त्याच्या पत्नीने आपल्या मुलाची झलकही चाहत्यांना दाखवली आहे. रहाणेची पत्नी राधिका धोपावकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून त्यांच्या मुलाचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी मुलाच्या नावाचाही खुलासा केला आहे. 

मराठमोळ्या नावाने वेधले लक्ष! दरम्यान, राधिकाने त्यांच्या मुलांचे दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यात मुलगा आणि मुलगी दोघेही दिसत आहेत. हे फोटो शेअर करत राधिकाने लिहिले आहे, "आर्या तिचा लहान भाऊ राघव रहाणेची ओळख करून देत आहे." म्हणजेच अजिंक्य रहाणे आणि राधिकाने आपल्या मुलाचे नाव राघव ठेवले आहे. राघव हा अजिंक्य आणि राधिकाचा दुसरा मुलगा आहे. यापूर्वी हे जोडपे 5 ऑक्टोबर 2019 रोजी एका मुलीचे पालक झाले होते. रहाणेने आपल्या मुलीचे नाव आर्या असे ठेवले आहे. रहाणेच्या दोन्ही मुलांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच 5 ऑक्टोबरला आहे.

'अजिंक्य'पुत्राची पहिली झलक 

अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांचे लग्न 26 सप्टेंबर 2014 मध्ये झाले होते. ज्याच्यानंतर त्यांनी 2019 मध्ये एका मुलीला जन्म दिला. अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांची प्रेमकहाणी जुन्या बॉलीवूड चित्रपटांची आठवण करून देणारी आहे, खरं तर हे दोघे बालपणीचे मित्र असून एकमेकांवर खूप प्रेम करतात. अजिंक्य आणि राधिका लहानपणापासून शेजारीच राहत होते. लक्षणीय बाब म्हणजे अजिंक्य रहाणे आताच्या घडीला भारतीय संघापासून दूर आहे. त्याला खेळाच्या मोठ्या फॉरमॅटमध्ये अर्थात कसोटी क्रिकेटमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर वगळण्यात आले. सध्या सुरू असलेल्या बांगलादेश दौऱ्यावरही तो संघाचा भाग नाही. मात्र, त्याला रणजी ट्रॉफीसाठी मुंबई संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :अजिंक्य रहाणेऑफ द फिल्डमुंबईभारतीय क्रिकेट संघ
Open in App