Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय ढेपाळले : आॅस्ट्रेलियाचा दणदणीत विजय , १-१ अशी बरोबरी

सलामी जोडी झटपट परतल्यानंतर मोझेस हेन्रिक्स (६२*) आणि ट्रॅव्हिस हेड (४८*) यांनी तिसºया विकेटसाठी केलेल्या नाबाद १०९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दुस-या टी-२० सामन्यात भारताचा ८ विकेट्सने दणदणीत पराभव केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:31 IST

Open in App

गुवाहाटी : सलामी जोडी झटपट परतल्यानंतर मोझेस हेन्रिक्स (६२*) आणि ट्रॅव्हिस हेड (४८*) यांनी तिसºया विकेटसाठी केलेल्या नाबाद १०९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दुस-या टी-२० सामन्यात भारताचा ८ विकेट्सने दणदणीत पराभव केला. यासह कांगारूंनी तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली असून शुक्रवारी होणाºया अखेरच्या टी-२० सामन्याला आता अंतिम सामन्याचे स्वरूप आले आहे.बारसापाडा क्रिकेट स्टेडियमवर प्रथम यजमानांची दाणादाण उडविल्यानंतर कांगारूंनी दमदार फलंदाजी करत भारत दौºयातील दुसरा विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करणाºया यजमानांचा डाव ११८ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर आॅसीने २७ चेंडू राखून २ बाद १२२ धावा काढत बाजी मारली. धावांचा पाठलाग करताना आॅस्टेÑलियाची सुरुवातही अडखळती झाली. जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमार यांनी अनुक्रमे डेव्हिड वॉर्नर (२), अ‍ॅरॉन फिंच (८) यांना बाद करून आॅसीची कोंडी केली. परंतु, यानंतर हेन्रिक्स - हेड यांनी नाबाद शतकी भागीदारी करून संघाचे मालिकेतील आव्हान कायम ठेवले. हेन्रिक्सने ४६ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ६२ धावांचा तडाखा दिला. हेडने ३४ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह नाबाद ४८ धावा केल्या.तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना आॅस्टेÑलियन गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज ढेपाळले. जेसन बेहरनडॉर्फ याने रोहित शर्मा, शिखर धवन, कर्णधार विराट कोहली आणि मनीष पांड्ये या प्रमुख चौकटीला बाद करून भारतीय संघाची दाणादाण उडवली. रोहित (८), धवन (२), कोहली (०) आणि मनीष (६) स्वस्तात परतल्याने भारताची पाचव्याच षटकात ४ बाद २७ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली. डावातील पहिल्याच षटकात जेसनने रोहित व कोहली यांना बाद करून भारताला जबर धक्के दिले.अनुभवी महेंद्रसिंह धोनीही १६ चेंडूंत १३ धावा काढून परतला.विशेष म्हणजे आपल्या चपळतेने भल्याभल्या फलंदाजांना क्षणात यष्टिचित करणारा धोनी यावेळीस्वत: यष्टिचित झाला. यानंतरकेदार जाधव (२७) आणि हार्दिक पांड्या (२५) यांनी थोडाफार प्रतिकार केला. परंतु, दडपणाखाली त्यांची बॅट फार काही चालली नाही. कुलदीप यादवने १६ धावांची छोटेखानी खेळी केल्याने भारताला समाधानकारक मजल मारता आली. अ‍ॅडम झम्पाने २, तर नॅथन कुल्टर - नाइल, अँड्रयू टाय आणि मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. (वृत्तसंस्था)धावफलकभारत : रोहित शर्मा पायचित गो. जेसन ८, शिखर धवन झे. वॉर्नर गो. जेसन २, विराट कोहली झे. व गो. जेसन ०, मनीष पांड्ये झे. पेन गो. जेसन ६, केदार जाधव त्रि. गो. झम्पा २७, महेंद्रसिंह धोनी यष्टिचित पेन गो. झम्पा १३, हार्दिक पांड्या झे. फिंच गो. स्टोइनिस २५, भुवनेश्वर कुमार झे. स्टोइनिस गो. कुल्टर - नाइल १, कुलदीप यादव झे. पेन गो. टाय १६, जसप्रीत बुमराह धावबाद (पेन) ७, यजुवेंद्र चहल नाबाद ३. अवांतर - १०. एकूण : २० षटकांत सर्व बाद ११८ धावा. गोलंदाजी : जेसन बेहरनडॉर्फ ४-०-२१-४; नॅथन कुल्टर-नाइल ४-०-२३-१; अँड्रयू टाय ४-०-३०-१; अ‍ॅडम झम्पा ४-०-१९-२; मार्कस स्टोइनिस ४-०-२०-१.आॅस्टेÑलिया : अ‍ॅरॉन फिंच झे. कोहली गो. भुवनेश्वर ८, डेव्हिड वॉर्नर झे. कोहली गो. बुमराह २, मोझेस हेन्रिक्स नाबाद ६२, ट्रॅव्हिस हेड नाबाद ४८. अवांतर : २. एकूण : १५.३ षटकांत २ बाद १२२ धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ३-०-९-१; जसप्रीत बुमराह ३-०-२५-१; हार्दिक पांड्या २-०-१३-०; कुलदीप यादव ४-०-४६-०; यजुवेंद्र चहल ३.३-०-२९-०.

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया