Indian Sqaud for Asia Cup 2022 : विराट कोहली, लोकेश राहुल या स्टार फलंदाजांच्या पुनरागमनाची चाहूल चाहत्यांना लागली आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी BCCI आज संघ जाहीर करण्याची शक्यता आहे. अशात भारताला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) हा आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धेत खेळणार नाही. त्याची पाठ दुखत आहे आणि त्याला त्यातून सावरण्यासाठी आणखी काही कालावधी हवा आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु PTI शी बोलताना BCCI च्या सूत्रांनी ही माहिती दिली.
''जसप्रीतला पाठीच्या दुखण्याने सतावले आहे आणि तो आशिया चषक स्पर्धेत खेळणार नाही. तो भारताचा प्रमुख गोलंदाज आहे आणि आगामी ट्वेटी-२० वर्ल्ड कप लक्षात घेता त्याच्याबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही. दुखापतग्रस्त असूनही त्याला आम्हाला आशिया चषक स्पर्धेत खेळवायचे नाही,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. इंग्लंड दौऱ्यावर बुमराह वन डे मालिकेत खेळला होता आणि त्यानंतर तो विश्रांतीवर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे व ट्वेंटी-२० आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या वन डे मालिकेत तो खेळणार नाही.
तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरण्यासाठी दाखल होईल. सध्या तो कुटुंबीयांसोबत फिरायला गेला आहे.
आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक
२७ ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
२८ ऑगस्ट- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
३० ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
३१ ऑगस्ट - भारत विरुद्ध क्वालिफायर, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
१ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
३ सप्टेंबर - B1 विरुद्ध B2, Super 4, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
४ सप्टेंबर - A1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
६ सप्टेंबर - A1 विरुद्ध B1, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
७ सप्टेंबर - A2 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
८ सप्टेंबर- A1 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
९ सप्टेंबर - B1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
११ सप्टेंबर - अंतिम सामना, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)