Join us

सचिन तेंडुलकर माझा ड्रिम ओपनिंग पार्टनर; शुबमन गिलने व्यक्त केली इच्छा

shubman gill sachin tendulkar : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 17:32 IST

Open in App

shubman gill ipl । मुंबई : आयपीएलचा गतविजेता गुजरात टायटन्सचा (gujarat titans) संघ यंदाच्या हंगामात देखील चमकदार कामगिरी करत आहे. ८ गुणांसह हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील गुजरातचा संघ आताच्या घडीला गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. संघाचा सलामीवीर शुबमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने सलामीच्या सामन्यातच याची झलक दाखवून दिली होती. त्याने यंदाच्या हंगामात ६ सामन्यांमध्ये २२८ धावा केल्या असून संघाला शानदार सुरूवात करून दिली आहे. ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी या तिन्ही प्रकारांमध्ये शतक ठोकणारा सलामीवीर फलंदाज म्हणून गिलची ओळख आहे.

अलीकडेच पार पडलेल्या एका कार्यक्रमात शुबमन गिलने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबाबत एक मोठे विधान केले आहे. २०२२ मध्ये गुजरात टायटन्सने पदार्पणाचा हंगाम जिंकला हा आयपीएलमधील सर्वात आवडता क्षण असल्याचे गिलने म्हटले आहे. मागील वर्षीच्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून स्पर्धेचा किताब पटकावला होता. साखळी फेरीतील १४ पैकी १० सामने जिंकून पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने पदार्पणाचा हंगाम अविस्मरनीय केला.

शुबमन गिलने व्यक्त केली इच्छाजिओ सिनेमावरील कार्यक्रमात २३ वर्षीय गिलने म्हटले, "महान सचिन तेंडुलकरसोबत सलामीवीर म्हणून खेळायचे माझे स्वप्न आहे." तसेच या कार्यक्रमात त्याला हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचे एका शब्दात वर्णन करण्यास सांगितले असता, त्याने म्हटले, "इलेक्ट्रिक". लक्षणीय बाब म्हणजे पंजाब किंग्जविरूद्ध ५९ चेंडूत ९६ धावांची खेळी आयपीएलमधील सर्वात अविस्मरनीय खेळी असल्याचे गिलने म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३शुभमन गिलसचिन तेंडुलकरगुजरात टायटन्सहार्दिक पांड्या
Open in App