Join us  

भारत 'राज'! पाकविरुद्धच्या पराभवाचा सर्व राग नेपाळवर निघाला, २५७ चेंडू राखून सामना जिंकला

Asian Cricket Council Under-19s Asia Cup - भारतीय संघाने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत आज नेपाळवर पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा सर्व राग काढला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 6:07 PM

Open in App

Asian Cricket Council Under-19s Asia Cup - भारतीय संघाने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत आज नेपाळवर पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा सर्व राग काढला. भारतीय गोलंदाज राज लिंबानी ( Raj Limbani) याने १३ धावांत ७ विकेट्स घेत नेपाळचा संपूर्ण डाव २२.१ षटकांत गुंडाळला. राजने ९.१ षटकांत १३ धावा देत एकूण ७ बळी घेतले. त्याने ११ धावांच्या आत ७ विकेट घेतल्या. त्याने त्याच्या चौथ्या षटकात विकेटचे खाते उघडले आणि त्यापूर्वी आधीच्या ३ षटकांत त्याने केवळ २ धावा दिल्या होत्या.  त्याच्या गोलंदाजीसमोर नेपाळचा संघ ५२ धावांत सर्वबाद झाला. नेपाळच्या ५२ धावांत १३ अतिरिक्त धावा होत्या.  

नेपाळ संघाचा एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. तळाच्या फळीतील फलंदाज हेमंत धामीनेही सर्वाधिक ८ धावा केल्या. प्रथम फलंदाजीला आलेल्या नेपाळ संघाला राजने ४.१ षटकांत सलामीवीर दीपक बोहराला बाद करून पहिला धक्का दिला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी पूर्ण वर्चस्व गाजवले. राजने ६.२2 षटकांत उत्तम मगर, ८.५ षटकांत कर्णधार देव खनाल, ८.६ षटकांत दीपक, १२.५  षटकांत दीपक बोहरा, १८.४ षटकांत सुभाष भंडारी व २२.१ षटकांत हेमंत यांना बाद केले.  त्यांच्याशिवाय आराध्य शुक्लाने दोन फलंदाज बाद केले. याशिवाय अर्शीन कुलकर्णीला १ विकेट मिळाली. भारताने ७.१ षटकांत हा सामना एकही विकेट न गमावता जिंकला. आदर्श सिंगने नाबाद १३, तर अर्शीन कुलकर्णीने १ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ४३ धावा चोपल्या.  

टॅग्स :एशिया कप 2023भारतनेपाळ