सिडनी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) मंगळवारी 2020 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर केले. 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या या स्पर्धेत 12 संघांमध्ये जेतेपदाची चुरस रंगणार आहे. 2007 च्या उद्घाटनीय स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय संघाची जेतेपदाची पाटी कोरीच आहे. महेंद्रसिंग धोनीनंतर आता 2020 मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप उंचावण्याचे आव्हान विराट कोहलीला पेलावे लागणार आहे. 'विराट'सेना भारताचा 13 वर्षांचा दुष्काळ संपवते का, याची उत्सुकता लागली आहे.
यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. भारताचा सामना पाहण्यासाठी चाहत्यांना 24 ऑक्टोबरची वाट पाहावी लागणार आहे. भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला करावा लागेल. 11 नोव्हेंबरला सिडनी आणि ॲडलेड येथे उपांत्यफेरीचे सामने खेळवले जातील. ऑस्ट्रेलियातील आठ विविध शहरांतील 13 स्टेडियमवर या स्पर्धेचे सामने खेळवले जातील. गतविजेत्या वेस्ट इंडिजला जेतेपद राखण्याच्या शर्यतीत सलामीलाच न्यूझीलंडचा सामना करावा लागेल.
पूर्ण वेळापत्रकhttps://www.icc-cricket.com/t20-world-cup/mens-fixtures
गट 1
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडिज
न्यूझीलंड
पात्रता फेरीतील 2 संघ
गट 2
भारत
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
अफगाणिस्तान
पात्रता फेरीतील 2 संघ