Join us

IND vs NEP : नेपाळच्या चाहत्याचा डान्स पाहून विराटही थिरकला; किंग कोहलीनं मैदानातच धरला ठेका

आशिया चषकात श्रीलंकेच्या पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात नेपाळचा पराभव करत भारताने विजयाचे खाते उघडले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 17:31 IST

Open in App

आशिया चषकात श्रीलंकेच्या पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात नेपाळचा पराभव करत भारताने विजयाचे खाते उघडले. पावसाच्या कारणास्तव षटके कमी करण्यात आली. डकवर्थ नियमानुसार दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग भारताने सहज करून दोन गुण मिळवले. या सामन्यातील विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नेपाळच्या चाहत्याला नाचताना पाहून भारताचा दिग्गज विराट कोहली ठेका धरताना दिसतो आहे.  

 दरम्यान, किंग कोहलीचा हा व्हिडीओ नेपाळच्या डावाच्या १४व्या षटकातील आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा क्षेत्ररक्षणात व्यग्र असताना कोहलीने ठेका धरून चाहत्यांचे लक्ष वेधले. कोहलीच्या या व्हायरल डान्स व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, सर्वात आधी एक नेपाळी महिला फॅन हातात देशाचा झेंडा घेऊन नेपाळी गाण्यावर नाचताना दिसत आहे. खरं तर नेपाळच्या संघाला आपल्या दोन्हीही सामन्यात पराभव पत्करावा लागला. सलामीच्या सामन्यात यजमान पाकिस्तानने नवख्या संघाचा २३८ धावांनी पराभव केला. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात त्यांना भारताकडून पराभव स्वीकारावा लागला. 

 भारताचा मोठा विजयनेपाळने सर्वबाद २३० धावा करून भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर पावसाचे आगमन झाले अन् सामना काही वेळ थांबवण्यात आला. अखेर डकवर्थ-लुईस नियमानुसार २३ षटकांत १४५ धावा करण्याचे लक्ष्य भारताला देण्यात आले. या लक्ष्याचा पाठलाग टीम इंडियाने एकही गडी न गमावता २०.१ षटकांत पूर्ण केला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने नाबाद (७४) आणि शुबमन गिलने नाबाद (६७) धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केला. 

टॅग्स :विराट कोहलीएशिया कप 2023नेपाळनृत्य
Open in App