Video : आकाश चोप्राच्या पत्नीनं दिली घर सोडून जाण्याची धमकी, जाणून घ्या कारण!

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 14:57 IST2020-07-09T14:56:30+5:302020-07-09T14:57:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Indian Ex cricketer aakash chopra share funny video with wife, Watch | Video : आकाश चोप्राच्या पत्नीनं दिली घर सोडून जाण्याची धमकी, जाणून घ्या कारण!

Video : आकाश चोप्राच्या पत्नीनं दिली घर सोडून जाण्याची धमकी, जाणून घ्या कारण!

कोरोना व्हायरसमुळे जगभरात क्रिकेट स्पर्धा कालपर्यंत बंद होत्या. पण, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्या कसोटी सामन्यानं 117 दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झालं. भारतात अजूनही क्रिकेट सुरू होण्यास वेळ आहे आणि देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, येथे क्रिकेट कधी सुरू होईल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. लॉकडाऊमुळे क्रिकेटपटूंना आपापल्या घरीच रहावे लागले आहे आणि त्यांना कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येत आहे. पण, गुरुवारी आकाश चोप्रानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आणि त्यात त्याच्या पत्नीनं चक्क घर सोडून जाण्याची धमकी दिली. 

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओंनाही नेटिझन्सना आवडतात. भारताकडून 10 कसोटी सामने खेळणाऱ्या आकाश चोप्रानं गुरुवारी इंस्टाग्रामवर असाच एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तो इंडियन प्रीमिअर लीग होणार की नाही आणि झालीच तर कधी होईल, असा प्रश्न विचारत आहे. तितक्यात त्याची पत्नी तेथे आली आणि या घरात सतत क्रिकेट क्रिकेट सुरू असतं. त्यानंतर तिनं घर सोडून जाण्याची धमकी दिली.. पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा...

View this post on Instagram

#feelkaroreelkaro #aakashvani #mrsandmrchopra

A post shared by Aakash Chopra (@cricketaakash) on

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

आयपीएल 2020 च्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवलेला नाही; या देशानं फेटाळलं वृत्त

शाहिद आफ्रिदीची मोठी घोषणा; इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाला देणार 'सहारा'!

बीसीसीआयचा पाकिस्तानला धोबीपछाड; श्रीलंकेच्या खांद्यावर  बंदूक ठेवून केली शिकार!

वेस्ट इंडिजच्या कर्णधाराकडून झाली चूक; विसरला महत्त्वाचा नियम 

सौरव गांगुलीच्या विधानाला किंमत नाही, दर आठवड्याला अशी चर्चा उठवली जाते; पीसीबीची टीका

 

Web Title: Indian Ex cricketer aakash chopra share funny video with wife, Watch